Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लुटारुंनी लुबाडले; संसाराचा गाडा घेवून महिला घोडागाडी ओढत निघाली; कोल्हापुरातील तरुणाने मदतीचा हात देऊन मने जिंकली

लुटारुंनी लुबाडले; संसाराचा गाडा घेवून महिला घोडागाडी ओढत निघाली; कोल्हापुरातील तरुणाने मदतीचा हात देऊन मने जिंकली


पंढरपूर येथील एक गरीब दाम्पत्य पोटाची खळगी भरण्यासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी काही अज्ञात तरुण लूटारूंनी त्यांना लुबाडले. यामुळे या दाम्पत्यांनी पुन्हा परतीची वाट धरली.

संसाराचा गाडा घेवून घोडागाडीच्या एका बाजूला घोड्याचे शेंघरू तर दुसऱ्या बाजूला महिला ही गाडी ओढत होती. यावेळी कोल्हापुरातील हेरले येथील तरुण यासर मुल्ला यांनी या दाम्पत्यांची विचारपूस केली. घडलेला प्रसंग ऐकताच त्यांना धक्का बसला. त्यांनी या कुंटुंबाला आधार देत माणुसकी जपण्याचे मदतीचा हात दिला. त्यांच्या दातृत्वामुळे परिसरात कौतूक होत आहे.

कोल्हापूर-सांगली फाटा ते हेरले मार्गे ते पंढरपूर दिशेला आपल्या घोडा गाडीने हे दोघे पती-पत्नी निघाले होते. संसाराचे साहित्य त्या गाडीवर, गाडीच्या एका जू वर एक घोड्याचे शेंघरू व दुसऱ्या बाजूला ती गरीब बाई जुवर व पाठीमागे त्याचा पती मागोमाग चालत निघाले होते. दरम्यानच यासर मुल्ला हे आपले काम आटोपून घरी येत होते. सांगली फाटा येथे त्याची नजर त्या गरीब दाम्पत्यावर गेली. यासर मुल्ला यांनी आपली गाडी बाजूला थांबवली व त्यांची विचारपूस केली. आपण कोठून आला व कोठे चालला, व एक शेंघरु कोठे आहे. यावेळी या दाम्पत्यांने घडलेला प्रसंग सांगताच ऐकून त्यांना धक्काच बसला.

काही अज्ञात तरुण लूटारूंनी त्यांचे एक शेंघुरू व त्यांच्या जवळ असणारी रक्कम काढून घेतली होती. यासर मुल्ला यांनी प्रथम त्यांना आपल्या घरी आणून त्यांना जेवण दिले. आजूबाजू परिसरामध्ये त्यांच्या शेंघुरुची चौकशी केली. परंतु शेंघूरू काही मिळाले नाही. यासर याने आपल्यामध्ये व आपला मित्र शहाबाजमध्ये असलेले बिन दाती शेंघुरुचे पिल्लू स्वतः टेम्पो मध्ये घालून पैसे न घेता गाडीला जुपून दिले. यासर याने जे कार्य केले त्याची चर्चा परिसरमध्ये होत आहे. सर्वत्र त्यांचे समाजसेवेबद्दल कौतूक होत आहे. त्या गरीब दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील निराशा घालवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले हाच खरा माझा आनंद - यासर मुल्ला, हेरले

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.