Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कारागृह विभागात २००० पदांची नवीन निर्मिती, लवकरच भरती!

कारागृह विभागात २००० पदांची नवीन निर्मिती, लवकरच भरती! 

राज्याच्या कारागृह विभागात हल्ली मंजूर पदांव्यतिरिक्त नव्याने दोन हजार पदे निर्माण केली जाणार आहेत. त्यानुसार शुक्रवारी गृह खात्याने मंजुरी दिली असून, शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहांमध्ये रिक्तपदांचा तिढा सुटण्याचे हे संकेत मानले जात आहेत. गृह विभागाचे उपसचिव यांच्या स्वाक्षरीने शुक्रवारी अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गांत नव्याने दोन हजार पदे निर्माण करण्याचा शासनादेश जारी करण्यात आला आहे. या शासनादेशात कारागृह महानिरीक्षक तथा अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या पाठपुराव्याचा आधार घेण्यात आला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

अशी मिळाली दोन हजार नव्याने वाढीव पदांना मंजुरी

अन्य महत्वाच्या भरती

* ZP हॉल तिकीट उपलब्ध; Download करा जिल्हा परिषद ऍडमिट कार्ड लिंक उपलब्ध!

* 10 वी पास उमेदवारांना सीमा पोलिस दल (ITBP) अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी! 620 रिक्त पदांची भरती सुरु

* मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!

* WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज


आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!

*आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !

*१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!

* आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

राजपत्रित गट ‘अ’ : १ विशेष कारागृह महानिरीक्षक, २ अधीक्षक मध्यवर्ती कारागृह, ७ मानसशास्त्रज्ञ, १६ मनोविकृतीशास्त्रज्ञ. राजपत्रित गट ‘ब’ : ७ जिल्हा कारागृह अधीक्षक, ९ वैद्यकीय अधिकारी (वर्ग २), २ सहायक/ प्रशासन अधिकारी.

अराजपत्रित गट ‘क’ : २६ वैद्यकीय अधिकारी (वर्ग ३). ५ कार्यालय अधीक्षक, ४५ तुरुंग अधिकारी (श्रेणी १). ११६ तुरुंग अधिकारी, २१ मिश्रक, १२ वरिष्ठ लिपिक, २१ लिपिक, ७ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ५६ सुभेदार, २७७ हवालदार, १,३७० कारागृह शिपाई (महिला, पुरुष), तर १० परिचालक.

राज्यातील ६० कारागृहांतील कैदी संख्या आठ पटीने वाढली असून ही बाब राज्य शासनासाठी चिंताजनक झाली आहे. सहा कैद्यांमागे किमान एक रक्षक असे राष्ट्रीय मापदंड असताना राज्यातील कारागृहात हा मापदंड पाळला जात नाही. या पार्श्वभूमीवर नवीन दोन हजार पदांची निर्मिती करून नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ९ मध्यवर्ती, २८ जिल्हा, एक किशोर सुधारालय, एक महिला, १९ खुली, एक खुली वसाहत अशी एकूण ६० कारागृहे आहेत. या कारागृहातील क्षमता २५ हजार ३९३ कैद्यांची असताना सध्या ४१ हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत. सुमारे १६ हजार कैदी जास्त आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि कारागृह सेवेसाठी ५ हजार ६८ पदांचा आकृतिबंध मंजूर आहे. सध्या ४ हजार १९४ पदे भरलेली आहे. त्यामुळे कैदी जास्त आणि कर्मचारी कमी असा विरोधाभास २००६ पासून सुरू आहे. सर्वसाधारणपणे सहा कैद्यांमागे एक रक्षक आवश्यक असल्याचे राष्ट्रीय प्रमाण आहे. यामुळे कैद्यांवर लक्ष ठेवणे कारगृह प्रशासनाला जिकिरीचे होऊ लागले आहे.

कांदिवली केईएस विधि महाविद्यालयाच्या रुची कक्कड यांनी जुलै २०१९ रोजी मुंबईतील कारागृहांना भेट दिली होती. या कारागृहात अधिकृत बंदीपेक्षा अतिरिक्त बंदी संख्या जास्त असल्याची तक्रार त्यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे २५ जुलै रोजी केली. त्याची आयोगाने दखल घेऊन पोलीस महासंचालकांना सद्य:स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी हा विरोधाभास आढळून आला असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.पावसाळी अधिवेशन काळात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या नोकरभरतीवर शिक्कामोर्तब झाले असल्याने लवकरच ही भरती होणार आहे.


सहा हजार पदे नामंजूर

जास्त कैदी आणि कमी कर्मचाऱ्यांमुळे अनेक वेळा कारागृहात कैद्यांना आवरणे कठीण जाते. कारागृह विभागाने सहा हजार पदे निर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता, पण वित्त विभागाने एवढी पदे मंजूर करण्यास असमर्थता व्यक्त केली. नवीन प्रस्तावानुसार २३२८ पदांच्या निर्मितीची मागणी करण्यात आली होती. त्यातही कपात करून तो दोन हजार पद निर्मितीचा प्रस्ताव तयार केला आहे. गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असल्याचे सांगितले.

राज्यात कारागृह विभागात तब्बल दोन हजार पदे रिक्त आहेत. यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने लवकरच रिक्त असलेली ही २ हजार पदे भरली जाणार असल्याची माहिती राज्यातील कारागृहांचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. सध्या राज्य कारगृह विभागात तब्बल पाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले तरी दोन हजार पदे ही रिक्त होती. ही रिक्त पदे भरण्यासाठी दोन हजार पदांची लवकरच भरती केली जाणार आहे,

कारागृह कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या नवीन भरती प्रक्रिया मध्ये अधिक ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्ष भरात विविध आजारांनी १२० कैद्यांचा मृत्यू झाला होता. यावर्षी हे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या साठी कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. त्यांची आरोग्य तपासणी देखील जाणार असल्याचे गुप्ता म्हणाले. गुप्ता म्हणाले,पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृह बनविण्यात येणार आहे. तसेच आणखी दोन नवीन कारागृह विभाग बनवण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. उद्योजक सायरस पूनावला यांनी येरवडा आणि कोल्हापूर येथील कारागृहातील दहा हजार कैद्यांना रोज गरम पाणी देण्याचे प्रस्ताव स्वीकारला आहे. राज्यातील कारागृह विभागाकडे १२०० संगणक मागणी आली असून ती लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.

गुप्ता म्हणाले, राज्यातील १२ कारागृहात ड्रोन लावण्यात येणार असून सुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने त्याचा वापर करण्याबाबत कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. राज्यातील कारागृहातील आतील परिसर तसेच कारागृह शेती परिसर विस्तीर्ण असून या परिसरातील कायद्यांच्या हालचालींवर निग्रणी ठेवणे व सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणे यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.