सांगली, दि. २९ : 'चला कृष्णामाईला स्वच्छ करूया' हा उपक्रम पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने उद्या सोमवार, दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत सांगलीतील विष्णूघाटाजवळ राबवला जाणार आहे.
यंदा पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदी कोरडी पडत चालली आहे. सांगली शहराजवळ कृष्णा नदीच्या पात्रात प्रचंड प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. सध्या पात्र कोरडी असल्यामुळे नदीची स्वच्छता करणे सोयीचे होणार आहे. सांगली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेजवळही पाणी आता राहिले नाही, त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडावे अशी मागणी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी केली होती. त्यानुसार कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी शहराजवळ येण्याआधीच नदीची स्वच्छता करणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्याच स्वच्छतेचा हा उपक्रम राबवला जात आहे.
सामाजिक जाणिवेच्या या उपक्रमात सांगली शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने बिपिन कदम, रवी खराडे, अजय देशमुख, सनी धोत्रे, आशिष चौधरी, प्रशांत ऐवळे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.