Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय चाहत्यांचा राडा, स्टेडियममध्ये हाणामारी अन् शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल

भारतीय चाहत्यांचा राडा, स्टेडियममध्ये हाणामारी अन् शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल


दिल्ली, 12 ऑक्टोबर : भारताने अफगाणिस्तानविरुद्धचा सामना ८ गडी राखून जिंकला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २७२ धावा केल्या होत्या. बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. भारताने या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने विजय मिळवला. दरम्यान, सामन्यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये भारतीय चाहते स्टेडियमवर एकमेकांशी लढताना दिसत आहेत.

सामना सुरू असताना चाहत्यांचे भांडण हा काही प्रकार नाही. सोशल मीडियावर चाहत्यांच्या भांडणाचे फोटो, व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. आता भारत अफगाणिस्तान यांच्या सामन्यावेळी अरुण जेटली स्टेडियममध्ये भारतीय चाहते एकमेकांना भिडले. यावेळी हाणामारीही झाली. याशिवाय चाहते शिवीगाळही करत होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, मैदानात नवीन उल हक आणि विराट कोहली मित्र झाल्याने ही लढाई आहे. तर काही चाहत्यांनी म्हटलं की, विराट आणि गंभीर यांचेही हे चाहते असू शकतात. तर एका चाहत्याने असंही म्हटलं की हे भांडण विराट आणि रोहितच्या चाहत्यांमध्ये होतंय.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.