कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक मासाळे यांचा इशारा
सांगली :
एन कॅप मधील निधीतून प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांच्या निविदा मॅनेज झाल्या आहेत. महापालिकेकडून 'ई' बससेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या बससेवेतही या एन कॅप निवीदा सारखा मॅनेज प्रकार होऊ नये. अन्यथा सांगलीच्या नागरिकांसह रस्त्यावर उतरू असा इशारा अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक मासाळे यांनी दिला आहे.
केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन कॅप) अर्थात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागास विविध कामासाठी केंद्र व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यातून अनेक कामे प्रस्तावित केली आहेत. रस्ते व गटार यातील जागेवर पेव्हिंग ब्लॉक्स बसण्याची कामे प्रस्थापित केली आहेत. ही कामे ठरविण्याचे निकष काय आहेत? हेच स्पष्ट झालेले नाही. यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या कामाची सर्वकंष चौकशी करावी अशी मागणीही मासाळे यांनी एका निवेदनाद्वारे आयुक्ताकडे केली आहे.
त्याचबरोबर भविष्यात सांगली महापालिका शहरात 'ई' बस सेवा सुरू करणार आहे. ही बस सेवा खाजगी कंत्राटदारमार्फत चालू करणार की सांगली महापालिका स्वतः सुरू करणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र या बस सेवेचा एन कॅप मधील कामाप्रमाणे यंत्रणा मॅनेज होऊ नये अशी आमची मागणी आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. सांगली शहराचा विकास व्हावा या दृष्टीने आयुक्त सुनील पवार व त्यांची अधिकाऱ्यांची टीम काम करते आहे. मात्र काही अधिकारी केवळ मॅनेज पद्धतीने काम करतात हे बंद झाले पाहिजे. यासाठी आमचा आग्रह आहे असे या निवेदनात मासाळे यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.