Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा नियोजन समितीची सभा शुक्रवारी

जिल्हा नियोजन समितीची सभा शुक्रवारी


सांगली दि. 16  : जिल्हा नियोजन समितीची सभा कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणाऱ्या या बैठकीत 12 मे 2023 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-2023 स्थानिक स्वराज्य संस्थाकडील योजना अंतर्गत कामांची भौतिक व ‍आर्थिक प्रगतीचा आढावा घेणे,  जिल्हा वार्षिक योजना सन 2023-2024 आढावा आणि अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे, अशी या सभेची विषयसूची आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.