Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरीरविक्री हा चांगला व्यवसाय आहे, स्टँडअप कॉमेडियनच्या विधानावरून वादंग

शरीरविक्री हा चांगला व्यवसाय आहे, स्टँडअप कॉमेडियनच्या विधानावरून वादंग


शरीरविक्री करणं हा व्यवसाय अतिशय चांगला व्यवसाय असल्याचं सांगणाऱ्या एका महिला स्टँडअप कॉमेडियनच्या विधानावरून सोशल मीडियावर वादंग माजलं आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.


या विनोदवीराचं नाव विदुषी स्वरुप असं आहे. तिच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये तिने वेश्या व्यवसायाची तुलना इतर नोकरी-व्यवसायाशी केली आहे. तिच्या या सादरीकरणात ती म्हणते की, वेश्या व्यवसाय हा एक कूल प्रोफेशन किंवा जॉब आहे. तिथे अन्य व्यवसायांच्या तुलनेने नवशिक्यांना अधिक संधी असते, असं म्हणून विदुषीने तिथे इतर नोकऱ्यांमध्ये नवशिक्यांना डावललं जाण्याबद्दल भाष्य केलं. तसंच, त्यानंतर तिने अशी काही विधानं केली ज्यामुळे नेटकरी आणखी संतापले.

तिची विधानं ही अतिशय लाजीरवाणी आहेत. यात कोणत्याही प्रकारचा विनोद नसून याहून खराब गोष्ट मी तरी पाहिलेली नाही. हे तथाकथित स्टँडअप कॉमेडियन अश्लीलता पसरवत आहेत, असे आरोप तिच्यावर करण्यात येत आहे. जर हेच एखाद्या पुरुषाने केलं असतं तर त्याच्यावर कारवाई झाली असती, असंही काहींचं म्हणणं आहे. दुसरीकडे विदुषीने ही क्लिप एका व्हिडीओचा भाग असल्याचं म्हटलं आहे. एका क्लिपच्या आधारे कोणतंही मत व्यक्त करू नका, असं आवाहन तिने नेटकऱ्यांना केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.