Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इस्लामपूरमध्ये एका बॉयफ्रेंडसाठी दोघी भिडल्या! महाविद्यालया समोर उलटल्या झिंज्या; लाथा बुक्कानी केली मारहाण

इस्लामपूरमध्ये एका बॉयफ्रेंडसाठी दोघी भिडल्या! महाविद्यालया समोर उलटल्या झिंज्या; लाथा बुक्कानी केली मारहाण 


इस्लामपूर: मुलींवरून मुलांमध्ये हाणामारी झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असेल. मात्र, इस्लामपूर येथे एक वेगळीच घटना उघडकीस आली आहे. एका बॉयफ्रेंडसाठी चक्क दोन जिगीरी मैत्रिणींमध्येच तुंबळ हाणामारी झाली असून विद्यालयाच्या पुढेच त्यांनी एकमेकीच्या झिंझ्या उपटत लाथा बुक्क्यांचा प्रसाद दिला.

अखेर विद्यालयाने ही घटना थेट निर्भया पथकाला सांगितली. त्यानंतर एका मुलावरुन ही रामायण घडल्याचं पुढे आले. तक्रार करूनही दुसऱ्या दिवशीही मुली शांत न बसल्याने विद्यालयाने अखेर त्यांना घरचा रस्ता दाखवला. एका मुलासाठी फ्रीस्टाइल हामाणारी करणाऱ्या मुली या मूळच्या वाळवा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातील आहेत. त्या इस्लामपुरातील एका महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होत्या. दोघीही खास मैत्रिणी. एकाच वर्गात असल्याने त्या सर्व गोष्टी एकमेकींना सांगत होत्या बोलत होत्या. रोज त्या विद्यालयातून बसस्थानका पर्यंत देखील सोबत जात होत्या. तर अनेकदा एकाबस मधून देखील त्या प्रवास करत होत्या.

दरम्यान, विद्यालय परिसरात असलेल्या एका कॉफीशॉप मध्ये देखील जाऊन त्या गप्पा मारत बसायच्या आणि इथेच घात झाला. कॉफीशॉप चालवणाऱ्या एका मुलावर दोघींचा जीव जडला. दरम्यान, त्यातील एकीने त्या मुलासोबत डेटिंग देखील सुरू केली. मात्र, ही बाब जेव्हा दुसरीला कळली तेव्हा तिचा तिळपापड झाला. मात्र, काही दिवसांनी पहिल्या मैत्रिणीचा मुलाशी ब्रेकअप झाला अन याचा फायदा घेत दुसरी मैत्रीण त्या मुलाच्या जवळ गेली. दोघातील प्रेमप्रकरणाची कुणकुण पहिलीला लागल्याने आता तिच्या जळफळाट झाला आणि इथेच वादाची ठिणगी उडाली.

बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास महाविद्यालयाच्या दारात दोघी एकमेकींच्या पुढे आल्या आणि वाद सुरू झाला. सुरवातीला शाब्दिक वादावादी अन् नंतर थेट झिंझ्या ओढत एकमेकींना गुद्दे घालत दोघी हाणामारी करू लागल्या. दोघींच्या वादात एकीच्या बहिणसुद्धा उडी मारली. या भांडणाची माहिती प्राचार्यांना मिळाल्यावर त्यांनी याची माहिती पोलिसांच्या निर्भया पथकाला दिली. दरम्यान दुसऱ्या दिवशीही दोघी भिडणार होत्या.

मात्र, प्रचार्यांनी त्यांना पालकांसह बोलावून घेत नेमके कारण जाऊन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या सांगण्यास तयार नव्हत्या. अखेर पोलिसांचा हात लागताच दोघी बोलू लागल्या. यानंतर एका मुलावरुन दोघींमध्ये हाणामारी झाल्याचे पुढे आले. दरम्यान, दोघी जुमानत नसल्याने अखेर प्राचार्यांनी तिघींना महाविद्यालयातून काढून टाकत त्यांना घरचा रस्ता दाखवला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.