Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठरल! हातकणंगले मतदारसंघातून प्रतीक पाटील लोकसभेच्या मैदानात ?

ठरल! हातकणंगले मतदारसंघातून प्रतीक पाटील लोकसभेच्या मैदानात ?

इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे सुपुत्र व राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांना हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे केली.पक्षाच्या आढावा बैठकीत शरद पवार यांच्याकडे ही केली आहे. त्यामुळे प्रतीक पाटील लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. हातकणंगले मतदार संघ शिवसेना- ठाकरे गटाकडे असताना काँग्रेसकडूनही या जागेवर दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता शरद पवार गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या मतदार संघातील तिढा वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यावेळी बैठकीत कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आली आहे. तर मविआच्या जागा वाटपातही हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. तसेच हातकणंगलेमधून प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे प्रतीक पाटील लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे, आमदार बाळासाहेब पाटील, अशोक पवार, माजी आमदार कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर आदी उपस्थित होते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.