Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली,मिरज शासकीय रूग्णालयातील औषध तुटवड्यासह असुविधेबाबत सामा.कार्य.मनोज भिसे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसमोर मांडला लेखाजोखा

सांगली,मिरज शासकीय रूग्णालयातील औषध तुटवड्यासह असुविधेबाबत सामा.कार्य.मनोज भिसे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसमोर मांडला लेखाजोखा


मुंबई : सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात औषधांच्या तुटवडयासह अनेक सोयीसुविधांचा अभाव असून नांदेड सारखी घटना सांगली जिल्ह्यातही घडू शकते. याकडे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंदकर यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.त्यामुळे सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेऊन या सर्व कारभाराचा लेखाजोखा मांडला. 

अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नणंदकर  यांचे रूग्णालयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, अशा अकार्यक्षम अधिष्ठात्यांना हटवून त्या ठिकाणी कार्यक्षम अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणीही आज मनोज भिसे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.                                                  

सांगली आणि मिरज या दोन्ही रुग्णालयांकडे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातूनही रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात.रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याने तसेच रुग्णांना गेल्या दीड वर्षांपासून बाहेरून औषधे आणावी लागत आहेत.कदाचित याही ठिकाणी नांदेड सारखी घटना घडून रुग्ण दगावल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न पडू शकतो.त्यामुळे आपण याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन या दोन्ही रुग्णालयांची घडी व्यवस्थित बसवून द्यावी अशी मागणीही मनोज भिसे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.                                           

लवकरच दोन्ही रुग्णालयांना भेट देऊन याबाबत ठोस उपाययोजना करून,रुग्णांची होणारी हेळसांड आणि गैरसोय थांबवणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे .

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.