Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

२२ ऑक्टोबर च्या मोर्चात शिक्षण संस्थांचा जनसागर सहभागी होणार ; रावसाहेब पाटील



२२ ऑक्टोबर च्या मोर्चात शिक्षण संस्थांचा जनसागर सहभागी होणार.. रावसाहेब पाटील

सांगली दि :शासनाच्या कंत्राटीकरण, शाळांचे खासगीकरण व समूह शाळा योजना या निर्णयामुळे महाराष्ट्राची अधोगती होणार आहे. या निर्णयामुळे शिक्षण संस्था, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक या साऱ्याच घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे २२ ऑक्टोबरच्या मोर्चात शिक्षण संस्थांचे पदाधिकारी,संचालक, कार्यकर्ते, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचा संपर्क सुरु आहे. जिल्ह्य़ातील सर्व खासगी शिक्षण संस्थांना मोर्चा सहभागाचे आवाहन पत्र पाठवून दिले आहे.

फोनवरूनही संपर्क साधला जात आहे. अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद आहे. सांगलीच्या या मोर्चाचे लोन राज्यभर पसरुन राज्याची घडी विस्कळीत करणारे अन्यायी शासन निर्णय तातडीने रद्द होण्यासाठी जनतेचा खदखदणारा असंतोष व्यक्त होणाऱ्या या मोर्चाचा प्रारंभ दि. २२ ऑक्टोबर रोजी पुष्पराज चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने होईल. सांगली स्टेशन चौकात मोर्चाचे सभेत रुपांतर होईल व कलेक्टरना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष सांगली जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील अण्णा यांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.