Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुरुषांनाही होतो स्तनाचा कर्करोग, जाणून घ्या कारणं

पुरुषांनाही होतो स्तनाचा कर्करोग, जाणून घ्या कारणं


स्तनाचा कर्करोग सामान्यतः स्त्रियांमध्ये होतो असे मानले जात असले तरी पुरुषांना देखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त असले तरी पुरुष देखील या रोगापासून मुक्त नाहीत हे लक्षात घ्यायला हवे.

दोघांच्या बाबतीत स्तनाच्या कर्करोगाची कारणे सारखीच असली तरी काही घटक वेगळे देखील आहेत. या लेखामध्ये आपण पुरुष आणि स्त्रियांना होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाची कारणे काय आहेत हे पाहणार आहोत. याबद्दल अधिक जाणून घेऊयात न्यूबर्ग अजय शाह लॅबोरेटरीचे व्यवस्थापकीय संचालक, डॉ. अजय शाह यांच्याकडून..

पुरुषांमधील स्तनाचा कर्करोग:

आनुवंशिकता: स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीत स्त्रियांप्रमाणेच पुरुषांच्या मध्ये देखील आनुवंशिकता हा महत्वाचा घटक आहे. कुटुंबातील कुणाला स्तनाचा कर्करोग होऊन गेला असेल तर त्यांना देखील होण्याची शक्यता जास्त असते. बीआरसीए1 आणि बीआरसीए2 जीन्स मधील बदल यामुळे देखील शक्यता वाढते.


रेडीएशन: आयोनायझिंग रेडिएशनचा संपर्क, विशेषत: छातीच्या भागात होत असल्यास पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. कर्करोगाच्या आधीच्या उपचारांमुळे किंवा हे व्यवसायातील धोके यामुळे संपर्काची शक्यता असते.

हार्मोनल प्रभाव:
इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या हार्मोन्समुळे स्त्रीयांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. हार्मोनच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहणे, जसे की मासिक पाळी लवकर सुरू होणे, उशीरा रजोनिवृत्ती किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, यामुळे शक्यता वाढू शकते.

वय: वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. 50 पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये प्रमाण जास्त असले तरी तरुणपणी होण्याची शक्यता देखील आहे.

पुनरुत्पादक घटक: कमी मुले असणे, उशिराने पहिले मूल होणे किंवा कधीही मूल न होणे यासारख्या घटकांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

जीवनशैली: अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान, चुकीचा आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव जीवनशैलीतील यासारख्या घटकांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी स्तनाचा कर्करोगाला सामोरे जाताना लवकर झालेले निदान आणि वेळेवर मिळालेली वैद्यकीय मदत खूप महत्त्वपूर्ण आहे. या आजाराला त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा तो बरा होण्याची शक्यता जास्त असते तेव्हा लक्षात यावा यासाठी स्तनांची नियमित स्व-तपासणी आणि तसेच वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. शिवाय, स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास किंवा इतर जोखीम घटक असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार तपासणी करून घेणे आणि प्रतिबंधक धोरणांवर चर्चा करणे आवश्यक आहे.

शेवटी, स्तनाच्या कर्करोगाची कारणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये थोड्याफार प्रमाणात वेगळी असली तरी, जनुकशास्त्र, जीवनशैली आणि हार्मोनल प्रभावांशी संबंधित सामान्य घटकांमुळे दोघांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. जागरुकता वाढवणे आणि लवकर लक्षात यावा यासाठी प्रोत्साहन देणे हे कोणताही लिंगभेद न करता सर्व व्यक्तींमध्ये स्तनाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात महत्त्वाचे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.