Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय राऊत म्हणजे घिसीपीटी कॅसेट ; मंत्री गुलाबराव पाटलांची टीका

संजय राऊत म्हणजे घिसीपीटी कॅसेट ; मंत्री गुलाबराव पाटलांची टीका

८ ऑक्टोबर २०२३: जळगावात नवनियुक्त संपर्कप्रमुख मनोज हिवरे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे बैठक पार पडली. यावेळी गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ना गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

मागील काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरून गुलाबराव देवकर यांनी शिंगाडा आंदोलनाचा इशारा दिला होता. यावर पत्रकारांनी विचारले असता ना.पाटील म्हणाले की साडेचार वर्षे हा माणूस पालकमंत्री राहिला. त्यांनी कधी हातात माईक घेतला नाही. डीपीडीसीच्या झालेल्या सर्व सभा एकनाथ खडसेंनी चालवल्या, असा टोला गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर लगावला.

दुसरीकडे संजय राऊत यांच्यावरही टीका केलीय. संजय राऊत म्हणजे घिसीपीटी कॅसेट आहे, तिला महत्व देत नाही. राऊत यांच्या म्हणण्याला मी फार महत्त्व देत नाही, असं सांगत पाटील यांनी राऊत यांच्या टीकेवर अधिक प्रतिक्रिया देणं टाळलं. राऊत यांनी फडणवीस यांचा उल्लेख मदारी असा केला होता. त्यावर ते बोलत होते.

 

कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या

दरम्यान, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं काम सर्वच राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम सुरू केलं आहे. तुम्ही हरला तर पावती माझ्या नावावर फाटेल. पण मी हरलो तर फटाके तुमच्या घराजवळ फुटतील, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.