Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली कापड पेठेतिल अत्यंत वरिष्ठ व्यापारी व माहेश्वरी समाजाचे जेष्ठ सक्रिय सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रीनारायणजी सारडा यांचे निधन

सांगली कापड पेठेतिल अत्यंत वरिष्ठ व्यापारी व माहेश्वरी समाजाचे जेष्ठ सक्रिय सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रीनारायणजी सारडा यांचे निधन 


सांगली कापड पेठेतिल अत्यंत वरिष्ठ व्यापारी व माहेश्वरी समाजाचे जेष्ठ सक्रिय सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रीनारायणजी सारडा यांचे ८६ व्या वर्षी आज दुपारी 2 वाजता दुःखद निधन झाले.
अत्यंत मनमिळाऊ, सेवाभावी अशा अद्भुत  व्यक्तीमत्वा चा अंत झाला आहे.
त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक संस्थे मधे कार्य केले आहे. त्यातील काही संस्था या प्रमाणे
पांजरपोळ संस्था, सांगली चे विद्यमान अध्यक्ष
कापड पेठ व्यापारी एसोसिएशन अध्यक्ष
सांगली जिल्हा माहेश्वरी सभा चे अध्यक्ष
राजस्थानी यात्री संघ, तिरुपति चे उपाध्यक्ष
श्री बालाजी मंदिर ट्रस्टी
महेश सेवा निधी ट्रस्टी
माहेश्वरी भवन ट्रस्टी
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा चे उपाध्यक्ष
अशी अनेक पदे भूषविली आहेत.


माहेश्वरी समाजा बरोबर इतर समाजातील त्यांच्या कामात, योग्यतेत, आणि मानवीय दृष्टिकोनाने त्यांच्या योगदानाने त्यांनी आपल्याला अद्वितीय मार्गदर्शन केलं. त्यांच्या संशोधनात्मक विचारांमध्ये, त्यांच्या सामाजिक क्रियाकलापांमध्ये, आणि त्यांच्या नेतृत्वात, त्यांचे अद्वितीय योगदान होते.
त्यांच्या पश्चात भाऊ, मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सागंल दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.