Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंबाबाईच वचन अर्धच राहीलं, ५ वर्षांपूर्वीची ती घटना कोल्हापूरकर कधीच विसरू शकणार नाहीत

अंबाबाईच वचन अर्धच राहीलं, ५ वर्षांपूर्वीची ती घटना कोल्हापूरकर कधीच विसरू शकणार नाहीत

नवरात्रोत्सव कोल्हापुरकरांसाठी खास असतो. तशी कोल्हापुरकरांवर देवीचा आशीर्वाद नेहमीच असतो. पण, या नऊ दिवसातही कोल्हापुरातले भाविक पहाटे काकडआरतीलाही मंदिरात गर्दी करतात. करवीरची आई असलेली अंबामाता एका राक्षसाच्या वधासाठी कोल्हापुरात आली. तिने वध केला अन् ती करवीर क्षेत्रीच राहीली.

करवीर निवासिनी आई अंबाबाईची आज गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली आहे. कोल्हापुरकरांसाठी नवरात्रीची पाचवी माळ ही खूप महत्त्वाची मानली जाते. कारण, यादिवशी आई अंबाबाई पालखीत बसून शहराबाहेर असलेल्या आपल्या बहिणीला म्हणजेच त्र्यंबोलीदेवीच्या भेटीला जाते. ती भवानी मंडपातून राजारामपूरीहून पुढे जात शहराचं शेवटचं टोक असलेल्या टेंबलाई टेकडीवर जाते.

अंबामातेने त्र्यंबोली देवीला एक वचन दिलं होतं.ते वचन पाळण्याची परंपरा अनादी काळापासून सुरू आहे. आजही लोक ती परंपरा विसरत नाहीत.पण, २०१९ च्या ललिता पंचमीला मात्र या परंपरेला गालबोट लागले. अंबामाता अन् त्र्यंबोली देवीची भेट तर झालीच पण तिथे सुरू असलेली एक परंपरा पाळली गेली नाही. त्यामुळे आई अंबाबाईने त्र्यंबोली देवीला दिलेले वचन पूर्ण झाले नव्हते. ते कोणते अन् काय होता तो प्रसंग पाहुयात.


प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासूर हा येथे राज्य करीत होता. तो महाभयकर राक्षस होता. त्याने राज्यात अनाचार करून देवांना त्रास दिला. म्हणून देवांनी देवीचा धावा केला. देवांच्या विनंतीवरून श्री महालक्ष्मीने राक्षसाच्या वधाची तयारी केली. श्री महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने राक्षसाचे मस्तक उडवून दिले. त्या राक्षसाच्या शरीराचा कोहळा झाला. आश्विन पुराणातून पंचमीस हा कोल्हासूर वधाचा प्रसंग झाला.

अंबाबाईने कोल्हासूराचा वध केला. पण असूर मरताना त्याने तीन वर मागितले एक या क्षेत्राला माझे नाव दे म्हणून हे कोल्हापूर. दुसरं या क्षेत्राला गयेच पावित्र्य दे म्हणून अंबाबाईने रौद्री गया तयार केली आणि तिसरं दरवर्षी माझ्या नावाने कोहळ्याचा बळी दे!


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.