Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्था निर्दोष सहकार तत्त्वाच्या पायावर उभी म्हणून संस्थेची गरूडझेप ;पृथ्वीराज पाटील

कर्मवीर पतसंस्था निर्दोष सहकार तत्त्वाच्या पायावर उभी म्हणून संस्थेची गरूडझेप ;पृथ्वीराज पाटील

सांगली दि.२४: राजकारणाचा संसर्ग झालेल्या अनेक पतसंस्था बुडाल्या परंतु सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील ६० हजार सभासदांचा विश्वास संपादन करुन एक हजार कोटींच्या ठेवीकडे झेप घेणारी कर्मवीर पतसंस्था ही सहकाराच्या शुध्द व निर्दोष पायावर भक्कमपणे उभी आहे म्हणून तिचे वटवृक्षात रुपांतर शक्य झाले आहे. ३६ वर्षात एकही निवडणूक नाही. पदाधिकारी व संचालक यांच्या स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे कायम संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध पार पडते. कर्मवीर अण्णांच्या नावाला साजेल असे काम आहे. असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. ते आज संस्थेच्या शंभर फुटी रोडवरील ६० व्या शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व स्व. डॉ. आप्पासाहेब चोपडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केले. ते म्हणाले, '  अवाढव्य व्याज आकारणी कधीच नाही. चांगले कर्जदार भेटत गेले त्यामुळे ५कोटीवरुन नफा २० कोटीवर गेला. बँकेपेक्षा पतसंस्थेवर सभासदांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालो. ठेवीदार, कर्जदार, सभासद व अधिकारी कर्मचारी यांच्यामुळे संस्था नावारूपाला आली.'

पृथ्वीराज पुढे म्हणाले,'कर्मचारी संस्थेला नंदादीप भेट देतात ही कर्मचाऱ्याची निष्ठा कौतुकास्पद आहे.सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील आणि स्व. वसंतदादा यांचे स्वप्न कर्मवीर पतसंस्था पूर्ण करत आहे. संस्थेने काळानुरूप बदल स्वीकारले. रावसाहेब पाटील यांचे काम खूप मोठे आहे.स्व.डाॅ.पतंगराव कदम यांनी त्यांना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचा सदस्य केले. खा. शरद पवार, ना. अजितदादा पवार व खा. सुप्रियाताई सुळे यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले आहे. संस्थेचे २००० कोटी ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे ही शुभेच्छा.

श्रीमती जयश्री पाटील म्हणाल्या, ' कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श जपणाऱ्या या संस्थेचा कारभार चांगला आहे. अनेकांचे संसार फुलवणाऱ्या या संस्थेची अशीच भरभराट' व्हावी.  जयश्री पाटील यांचा सत्कार संचालिका भारती चोपडे व चंदन केटकाळे यांनी केला. पृथ्वीराजबाबा पाटील यांचा सत्कार वसंतराव नवले यांनी केला. शंभर फुटी शाखेचे नूतन सल्लागार राहूल चौगुले, शितल आवटी व प्रकाश पाचोरे, जागा मालक संजय पाटील, शाखाधिकारी विनय सावळवाडे व विभागीय अधिकारी संदिप मुडलगी यांचा सत्कार पृथ्वीराज पाटील व जयश्री पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी नंदादीप भेट दिला. आभार वसंतराव नवले यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. यावेळी जनरल मॅनेजर अनिलकुमार मगदूम, संस्थेचे पदाधिकारी, संचालक, विविध क्षेत्रातील मान्यवर, शाखांचे सल्लागार व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.