राजू शेट्टींची पदयात्रा स्थगित, मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा, मनोज जरांगेंची घेणार भेट
मागील हंगामातील ऊस गाळपाचे प्रतिटन ४०० रुपये अधिक देण्याच्या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी साखरकारखानदारांच्या दारात पायी जाऊन २२ दिवस आक्रोश पदयात्रा काढत आहेत. दरम्यान ही पदयात्रा सांगली जिल्ह्यात जाऊन पोहोचली आहे. आज (ता.३०) १४ व्या दिवशी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही पदयात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षणावरून सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देत त्यांनी ही या तात्पूर्ती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर ते तातडीने मनोज जरांगेंच्या भेटीलाही जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गळीत हंगाम २०२२ -२३ च्या ऊसाला ४०० रु दुसरा हप्ता मिळावा व वजन काटे ऑनलाईन व्हावेत या मागणीसाठी २२ आक्टोबर ते ७ नोव्हेंबर अखेर चालू असलेली आक्रोश पदयात्रा १४ व्या दिवशी आज सांगली जिल्ह्यातील करमाळे या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देत स्थगित करण्याचा निर्णय घेतला.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषनाचा आज ५ वा दिवस आहे यामध्ये जरांगे पाटील यांची तब्बेत खूपच खालावली आहे. आपल्या सारखाच एक कार्यकर्ता मराठा आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करीत आहे.
असे असताना आपण हार, गुच्छ व फुलांचे हार गळ्यात घेणे मनाला पटले नाही म्हणून, आजपासून पदयात्रेला स्थगिती देवून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी इस्लामपूर येथील शासकिय अतिथी गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. ऊस दराचा निर्णय झाल्याशिवाय कोणताही साखर कारखाने सुरु करु नये व कारखान्यातून साखर बाहेर सोडू नये असे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना शेट्टी यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.