Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वीस हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह वकिलाला अटक

वीस हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह वकिलाला अटक



पुणे :  अपघातातील वाहनाची विम्यासह अन्य कागदपत्रे तसेच गुन्ह्यातील अन्य कागदपत्रे देण्यासाठी वीस हजारांची लाच घेताना वकिलासह पोलिस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. रविवारी भिगवन पोलिस ठाण्याजवळ पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सुग्रीव लोकरे (वय ५३), वकील मधुकर विठ्ठल रोकडे (वय ३५, रा. कर्जत, अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या वडिलांचा अपघात झाला होता. त्यात त्यांचे निधन झाले होते. त्यांना धडक देणाऱ्या वाहनाची विम्याची तसेच दाखल गुन्ह्याची कागदपत्रे देण्यासाठी उपनिरीक्षक लोकरे यांनी वकील रोकडे यांच्या माध्यमातून तीस हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती वीस हजार रूपये देण्याचे ठरले. 

याबाबत तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर उपनिरीक्षक लोकरे यांनी वकील रोकडे यांच्यामार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रविवारी भिगवन पोलिस ठाण्याजवळ लोकरे यांच्यासाठी वीस हजारांची लाच घेताना रोकडे यांना रंगेहात पकडण्यात आले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी भिगवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.