Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एसटीचा भीषण अपघात ,मालवाहतूक समोरासमोर धडक


मालवाहतूक टेम्पो, एसटीचा भीषण अपघात

सांगलीत घटना ; माधवनगरचा चालक गंभीर जखमी


सांगली, ता. १० ः येथील बसस्थानकडेकडे जाणाऱ्या आंबेडकर रस्त्यावर आज रात्री नऊच्या सुमारास मालवाहतूक टेम्पो आणि एसटीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात मालवाहतूक टेम्पो चक्काचूर झाला असून चालक गंभीर जखमी आहे. रोहित लक्ष्मण म्हेत्रे (वय २१, रा. माधवनगर) असे त्याचे नाव आहे. येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळावरून मिलालेली माहिती अशी,  माधवनगर येथील एका व्यापाऱ्याच्या मालवाहतूक टेम्पोवर जखमी म्हेत्रे हा चालक म्हणून काम करत होता. रात्री उशीरा टेम्पो (एमएच १० सीआर ९४६४) इचलकरंजीहुन माल घेवून येत होते. येथील आंबेडकर रस्त्यावरून रात्री जात असताना समोरून छत्रपती संभाजीनगर डेपोची एसटी (एमएच ११ टी ९५७५) बसस्थानकच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोची एसटीला जोरात धडक बसली. अपघात इतका भीषण होता की चालक रक्ताच्या धारोळ्यात पडला. बघ्यांची मोठी गर्दी झाली. लोकांनी तातडीने जखमी म्हेत्रे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनीही घटनास्थळी पंचनामा केला. सांगली बसस्थानक प्रमुख शीतल माने यांच्यासह पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. तसेच शासकीय रुग्णालयातही रुग्णांची विचारपूस केली. तसेच अपघात झालेल्या एसटीतील प्रवाशांची तातडीने सोय करण्यात आली. दरम्यान, या अपघातात चूक कोणाची याचा पोलिस तपास करत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.