Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत सराफी दुकानातून दोन लाखाचे दागिने लंपास

सांगलीत सराफी दुकानातून दोन लाखाचे दागिने लंपास


सागंली: शहरातील त्रिमुर्ती चौक येथील एका ज्वेलर्स दुकानातून भरदुपारी चोरट्याने १ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून पलायन केले. ही घटना २९ रोजी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात आण्णासाहेब सोबान शिंदे (रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, त्रिमुर्ती चौक सांगली ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित सचिन माने (पूर्ण नाव नाही) याच्यावर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आण्णासाहेब शिंदे यांचे त्रिमुर्ती कॉलनीत ओम शांती ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. २९ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संशयित सचिन माने दुकानात आला. त्यावेळी दुकानात फिर्यादी शिंदे यांच्यासह त्यांची मुलगी मयुरी होती. तिच्याकडून सोन्याचे दागिने पाहण्यासाठी म्हणून संशयिताने १ लाख ८५ हजाराचे दागिने घेतले. या दागिन्यासह त्याने दुकानातून पलायन केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.