Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सांगलीत आज शिव प्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडचा समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.

संभाजी भिडे यांनी सांगितले की, नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू आहेत. दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा प्रारंभ असून कर्तृत्व शून्य हिंदू समाजाला सीमोल्लंघनासाठी कटिबद्ध करण्यासाठी दुर्गामाता दौड असल्याचे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. नवरात्रीनिमित्ताने सांगलीमध्ये सुरू असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या दुर्गामाता दौडीची आज मोठ्या उत्साहात सांगता झाली. या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.


नऊ दिवस सांगली शहरामध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहामध्ये दुर्गामाता दौड सुरू होती. तरुणांच्यामध्ये देशभक्ती आणि धर्माबद्दल जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ४० वर्षांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानकडून दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते. आज दसऱ्याच्या दिवशी दुर्गामाता दौडचा समारोप करण्यात आला.

नवरात्राेत्सव सार्वत्रीकरित्या साजरा करण्यासाठी दुर्गामाता दाैडची संकल्पना संभाजी भिडे यांनी पुढे आणली. युवावर्गात हिंदू धर्माविषयी जागृती निर्माण करणे याबराेबरच युवकांचे संघटन करणे या हेतूने १९८३ पासून संभाजी भिडे यांनी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गामाता दौड सुरु केली. नवरात्रोत्सवाचे वातावरण आणि दुर्गामात दौड हे आता एक समीकरण झाले आहे. या निमित्ताने सांगली शहरात एकी निर्माण हाेते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.