Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जेवढा बॅलन्स, तेवढीच वीज! राज्यात लवकरच बसविणार स्मार्ट मीटर

जेवढा बॅलन्स, तेवढीच वीज! राज्यात लवकरच बसविणार स्मार्ट मीटर


मुंबई : वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यांत हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होणार आहेत. महावितरणच्या २ कोटी ४१ लाख ग्राहकांचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार आहेत. त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. मीटर बसविल्यावर ग्राहक मोबाइल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. विजेसाठी किती खर्च करायचा हे निश्चित करता येईल. किती वीज वापरली याची माहिती मोबाइलवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशापैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा, हेसुद्धा ग्राहकांना समजेल.

२ कोटी ४१ लाख ग्राहकांचे पारंपरिक मीटर बदलणार लाइट जाणार नाही स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा खंडित होईल. मात्र, ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत, हे सुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल.

घर बसल्या मोबाइलवरून ऑनलाइन पेमेंटची सुविधा आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला मोबाइलवर मेसेज पाठविण्याची व्यवस्था आहे. एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीजपुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीजपुरवठा चालू राहील. ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीजपुरवठा चालू ठेवायचा. त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील, अशी सुविधा मीटरमध्ये आहे. मीटर मोफत  नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळेल. मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.