क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये सांगलीला मिळाला सन्मान
सांगली : सध्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचे सामने रंगात आले आहेत. त्यात श्रीलंका क्रिकेट संघाच्या लायझनिंग ऑफिसरपदी (संपर्क अधिकारी) सांगलीचे राहुल आवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा सांगलीच्या क्रिकेटच्या परंपरेला सन्मान आहे.
सोमवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात पुण्यातील गहुंजे क्रीडांगणावर सामना होत आहे. या सामन्यासाठी राहुल आवाडे यांची श्रीलंका संघाच्या लायझनिंग ऑफिसरपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाच्या आदेशानुसार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुभेद्रा भांडारकर व खजिनदार संजय बजाज यांनी आरवाडे यांच्या निवडीची घोषणा केली. आवाडे यांनी सांगली जिल्हा क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तसेच ते पोलाइट स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष आहेत. या निवडीमुळे विश्वचषक स्पर्धेमुळे सांगलीचा सन्मान झाला आहे.
सागंल दर्पण परिवाराकडून हार्दिक अभिनंदन
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.