लोणावळा हादरले! आधी मुलीचं अपहरण, नंतर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक
पुणे: पुणे जिल्ह्यातील पर्यटणासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा येथे दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेमुळे लोणावळा परिसर हादरला होता. या घटनेत दोन टोळ्या कार्यरत असल्याचे तपासात आढळले असून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत १० गुन्हेगारांच्या टोळीचा सहभाग असल्याचे तपसात पुढे आले आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यातील २ आरोपी अल्पवयीन आहेत. आरोपींनी लोणावण्यात पर्यटनासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे दोन दिवसांपूर्वी अपहरण केले होते. त्यांना निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता. एका मुलीचे लोणावळा रेल्वे स्थानकावरून अपहरण करत आरोपींनी तिला डांबून ठेवत तिला मारहाण केली. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी अपहरण केलेल्या एका मुलाचीही सुटका केली आहे. या टोळीतील १० पैकी ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचे दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अपहरण केले. हनुमान टेकडी परिसरातील तिला एका घरात साखळीने बांधून ठेवत तिला मारहाण करण्यात आली. आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला आहोत. पीडित मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर बेताब आनंद पवार, मंदा बेताब पवार, संजना बबलू पवार, बबलू पवार, अर्चना बेताब पवार, किरण बेताब पवार, मोनिका बेताब पवार, राज सिद्धेश्वर शिंदे, करीना राज शिंदे (सर्व रा. क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसऱ्या घटनेत आरोपींनी
उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. पीडित मुलगी लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात थांबली होती. त्यावेळी तिचे अपहरण करून तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार करीना राज शिंदे, मंदाकिनी बेताब पवार, संजना बबलू ठाकूर, बबलू पवार, राज सिद्धेश्वर पवार, बेताब आनंद पवार, ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लोणावळा उपविभागाचे विभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम डुबल तपास करत आहेत.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी राज सिद्धेश्वर शिंदे आणि ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे या दोघांना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. तसेच आरोपींपैकी दोघे अल्पवयीन आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन येरवडा येथील सुधारणा गृहात पाठवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही आरोपींच्या नावे आधीही काही गुन्ह्यांची नोंद आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.