Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाही 'काली-पिली; आज शेवटची धावणार

मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाही 'काली-पिली; आज शेवटची धावणार


मुंबई  : गेल्या सहा दशकांपासून मुंबईच्या रस्त्यांवर धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी ही शहराची ओळख आहे. शहरात फिरण्यासाठी, वाहतुकीचं साधन असलेली ही गाडी 'काली-पिली' म्हणूनही ओळखली जायची. मात्र आता सहा दशकांनी या टॅक्सीची चाके थांबणार आहेत. नवे मॉडेल आणि एप आधारित कॅब सेवांनंतर 'काली-पिली' टक्सी आता मुंबईच्या रस्त्यावरून गायब होईल. नुकतंच सार्वजनिक वाहतुकीतून बेस्टच्या लाल डबल डेकर डिझेल बसेसची सेवा बंद कऱण्यात आली होती. त्यानंतर 'काली-पिली' टॅक्सीही रस्त्यावर दिसणार नाही.

परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रीमियर पद्मिनीची २९ ऑक्टोबर २००३ ला ताडदेव आरटीएमध्ये शेवटची नोंदणी झाली होती. शहरात टॅक्सी चालवण्यासाठीची कालमर्यादा २० वर्षे आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंबईत अधिकृतपणे प्रीमियर पद्मिनी टॅक्सी चालवता येणार नाही.

शेवटची नोंदणी केलेल्या प्रीमियर पद्मिनी टॅक्सीचे मालक प्रभादेवींनी म्हटलं की, मुंबईची ही शान आणि आमची जान आहे. दरम्यान, काही लोकांनी किमान एक प्रीमियर पद्मिनी रस्त्यावर किंवा संग्रहालयात ठेवण्यात यावी. जुन्या कारचे शौकिन डॅनियल सिकेरा यांनी म्हटलं की, ही सुरक्षित टॅक्सी पाच दशकांहून अधिक काळ शहराचा एक भाग राहिली आहे आणि अनेक पिढ्यांच्या भावना या टॅक्सीसोबत जोडल्या गेल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी शहरातील सर्वात मोठ्या टॅक्सी चालक संघटनेपैकी एक असलेल्या मुंबई टॅक्सीमॅन युनियनने सरकारकडे किमान एका काळ्या पिवळ्या टॅक्सीला संरक्षित करावं यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेला फेटाळून लावण्यात आले. परेलमधील प्रदीप पालव यांनी म्हटलं की, प्रीमियर पद्मिनी टॅक्सी फक्त मुंबईत भिंतीवर लावलेल्या पोस्टर्समध्येच बघायला मिळते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.