Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शासकीय रुग्णालयांतील सोयी सुविधांच्या बोजवारा उडालेल्या विरोधात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना दिले निवेदन; मनोज भिसे

शासकीय रुग्णालयांतील सोयी सुविधांच्या बोजवारा उडालेल्या  विरोधात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना दिले निवेदन; मनोज भिसे 


सांगली :- सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील सोयी सुविधांच्या बोजवाऱ्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.हसनजी मुश्रीफ साहेब यांना सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी निवेदन देऊन सांगलीसह मिरज शासकीय रुग्णालयातील सोईसुविधांच्या उडालेल्या बोधवाऱ्याबाबतचा आढावा दिला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत लवकरच मिरजेसह सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयास भेट देणार असल्याचे मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी म्हटले आहे. नांदेड मधील शासकीय रुग्णालयात औषधांच्या तुटड्यांमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात आणि मिरज शासकीय रुग्णालयात औषधांसह इतर सोयी सुविधांचा तुटवडा पडल्याने नांदेड सारखीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून हा पुरवठा सुरळीत करावा. कारण या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी फक्त सांगली जिल्ह्यातीलच नाही तर पश्चिम महाराष्ट्र,कर्नाटक आणि कोकणातूनही रुग्ण येत असतात त्यामुळे या खात्याचे मंत्री म्हणून आपण ही कमतरता भरून काढून भविष्यातील दुर्घटना टाळाव्यात अशी मागणी आज सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी राज्याचे वैद्यकय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.हसनजी मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे केली आहे.
    
 एम.आर.आय.,सिटी स्कॅन मशिनवर रूग्णांच संख्या वाढल्याने मोठा ताण पडतो,अनेकवेळा मशिन बंद पडतात त्यामुळे रूग्णाला बाहेरून या टेस्ट कराव्या लागतायत.गेल्या दीड वर्षापासून रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागत आहेत.याबाबतही चर्चा करण्यात आली. दरम्यान वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री म्हणून, प्रत्यक्ष भेट देऊन,जाणीवपूर्वक लक्ष घालणार असल्याची ग्वाही मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.