'सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतोय'निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा
मुंबई : सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशी मोठी खळबळ उडविणारी घोषणा केली आहे. सक्रिय राजकारणातून कायमची निवृत्ती घेत असल्याचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असे म्हणत निलेश राणे यांनी मन मोकळे केले आहे.
मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिले. कारण नसताना माझ्या सोबत राहिलात, त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटले आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली. त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळाले आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचे मनात घर करून गेले. आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणे वगैरे यात मला आता र राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.