सर्व मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर देशाची ही अवस्था नसती, केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी हिंदुस्थानच्या फाळणीवर एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जर फाळणीच्या वेळी सर्व मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर देशाची आता जशी अवस्था आहे तशी अवस्था नसती, असे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केले आहे.
गिरीराज सिंह यांनी बेगूसराय, छपरा येथे देवी विसर्जनाच्या मिरवणूकीवर झालेल्या दगडफेकीबाबात प्रतिक्रीया देताना हे वक्तव्य केलं आहे. '75 वर्षापूर्वी एक मोठी चूक झाली. आमच्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची शिक्षा आपण भोगत आहोत. जर सर्व मुसलमान त्यावेळी पाकिस्तानात गेले असते तर देशाची ही दुर्दशा नसती. हे सर्व दुर्दैवी आहे', असे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.