Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू, हलगर्जीपणामुळे मुख्याध्यापक आणि वसतीगृह अधिक्षकाचं निलंबन

शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू, हलगर्जीपणामुळे मुख्याध्यापक आणि वसतीगृह अधिक्षकाचं निलंबन


शेततळ्यात बुडून बहीण भावाचा मृत्यू झाल्याप्रकरणी तालुक्यातील आल्हनवाडी येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व वसतिगृहाच्या अधिक्षकांवर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत दोघांना निलंबित करण्यात आले आहे. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे आपण पाठविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शुक्रवारी दुपारी या आश्रमशाळेत शिकत असलेले पायल संदीप पांढरे (वय ९) व सुरज संदीप पांढरे (वय ८) हे दोघे बहीणभाऊ शाळेच्या मधल्या सुटीत शाळेच्या पाठीमागे असलेल्या शेततळ्याकडे गेले होते. त्यानंतर दुपारी या दोघांचेही मृतदेह शेततळ्यात आढळून आले. शाळेतील शिक्षक व वसतिगृहाचे अधिक्षकांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप पांढरे यांच्या कुटुंबियांनी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

विशेष म्हणजे घटनास्थळी मुख्याध्यापक व अधीक्षक फिरकले नाहीत. या घटनेची दखल घेत शनिवारी राधाकिसन देवढे यांनी या आश्रमशाळेला भेट देऊन चौकशी केली. यात त्यांना शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब म्हस्के व वसतिगृहाचे अधीक्षक ज्ञानदेव कर्डिले हे दोघांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी दोघांना तातडीने निलंबित केले

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.