रणधीर कदम यांची मराठा स्वराज्य संघाच्या जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड
मराठा स्वराज्य संघाची वार्षिक सभा पार पडली, मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत सभा पार पडली. या वेळेला संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव बापू म्हणाले की मराठा स्वराज्य संघ स्थापन करून गेले तेरा वर्षे मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी आम्ही व समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक आंदोलने केली यामध्ये रस्ते रोको, मोर्चे, निवेदने धरणे आंदोलन,बेमुदत उपोषणे करून समाजाच्या मागण्या केंद्र व राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्याचे काम लोकशाही मार्गाने केले यापुढेही करत राहू या वेळेला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवीन निवडी जाहीर करण्यात आल्या .
यामध्ये सांगली जिल्ह्याच्या मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जत तालुक्याचे सर्वांगीण विकास साधणारे,वकील क्षेत्रात आपले नाव कमवणारे व नामा मात्र फी घेऊन सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे, जत तालुका वकील संघटनेचे माजी अध्यक्ष, कार्यकारी दंडाधिकारी माननीय एडवोकेट रणधीर कदम यांची निवड करून त्यांना पत्र देत आहे. या वेळेला संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे पुढे म्हणाले की मराठा स्वराज्य संघाच्या संघाच्या माध्यमातून मराठ्यांचा विकास व्हावा त्याबरोबर सर्व बहुजन समाजातील सर्व जाती धर्माचा विकास व्हावा व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आज आम्ही एडवोकेट रणवीर कदम यांची त्यांची त्यांनीआतापर्यंत केलेली सामाजिक कार्य बघून त्यांना आम्ही सांगली जिल्ह्याच्या मराठा स्वराज्य संघाच्याअध्यक्ष पदी म्हणून निवड केली आहे.
तसे निवडीचा मी आज त्यांना पत्र देत आहे या वेळेला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष एडवोकेट रणधीर कदम म्हणाले म्हणाले की मी जत सारख्या दुर्गम भागामध्ये जिल्ह्यामध्ये जतचा लोकसंख्या व विस्तार ने मोठे असणाऱ्या भागांमध्ये व प्रत्येक गावामध्ये जाऊन मराठा स्वराज्य संघाची शाखा सुरू केले जाईल व त्या माध्यमातून मराठा समाजा बरोबर इतर समाजाचे विकासासाठी प्रयत्न केले जातील माझी मराठा स्वराज्य संघाच्या सांगली जिल्हाअध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे व राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांचे मी आभारी आहोत व या पुढील काळात मी माझे काम बोलून दाखवणार नाही परंतु रस्त्यावर उतरून करून दाखवेन असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी राज्य प्रवक्ते मा. संतोष पाटील म्हणाले आम्ही मागील काही काळामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार माननीय शरद पवार साहेब यांना बारामती येथे भेटून आलो व त्यांनी आमचे अस्थाने विचारपूस करून तुमच्या काही अडचणी असतील व तुम्ही घेऊन येणारे निवेदन स्वीकारून ते मार्गी लावून दिले जातील व तुमच्या अडचणी सोडवल्या जातीलअसे त्यांनी आम्हाला सांगितले. या वेळेला डफळावरचे सरकार रमेश शिंदे यांची जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली.या वेळेला प्रवक्ते प्राध्यापक वसंत चव्हाण, सरपंच सुनील कारंडे, गणपतराव पवार कोडग,मच्छिंद्र बाबर,पंडित पाटील जत तालुक्याच्या महिला अध्यक्ष सौ श्रद्धा शिंदे, प्रवीण जाधव व अनेक पदाधिकारी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले व यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.