भाजप खासदाराने महिला आमदाराचा आधी हात पकडला आणि नंतर खांद्यावर हात ठेवला; महिला आमदारांनी जागाच बदलली!
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील अलीगडमधील भाजपच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भाजपचे खासदार सतीश गौतम हे महिला आमदार मुक्ता राजा यांच्या शेजारी बसल्याचं दिसत आहे. सतीश गौतम मुक्ता राजा यांच्या हातावर हात ठेवतात. यावर महिला आमदार नाराज होते. त्यानंतर सतीश गौतम महिलेचा खांदा पकडल्याचं दिसत आहे. (सागंली दर्पण या व्हिडिओशी पुष्टी करत नाही)
भाजप खासदार सतीश गौतम महिला आमदाराशी थट्टा मस्करी करताना दिसत आहेत. पण, मुक्ता राजा यावर खूष नसल्याचं व्हिडिओवरुन दिसतंय. या सर्व प्रकारानंतर मुक्ता यांनी जागा बदलल्याचंही सांगण्यात येतंय. या घटनेचा व्हिडिओ एकाने आपल्या मोबाईलवर शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
कोल विधानसभा मतदारसंघात आमदार अनिल पाराशर यांच्यातर्फे पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अनेक भाजपने नेते आले होते. कार्यक्रमाला परिवहन मंत्री दयाशंकर सिंह आणि उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय हेही उपस्थित होते. सर्व नेते व्यासपीठावर बसले होते. त्यादरम्यान हा प्रसंग घडला.
भाजपकडून प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. खासदार आणि आमदार यांच्यामध्ये आई-मुलासारखं नातं आहे. पण, काही विरोधकांनी राजकारणाची पातळी किती खाली आणली आहे हे यावरुन दिसतं. यातून त्यांना आई-मुलगा किंवा भाऊ-बहिणीचे नाते दिसले असते. पण, त्यांची नियत वाईट आहे, असं भाजपने म्हटलंखासदार सतीश गौतम यांनीही या व्हिडिओवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. माझे आणि महिला आमदाराचे आई-मुलासारखं नातं आहे. पण, ज्या प्रकारे हा व्हिडिओ पसरवला जात आहे ते पाहून दु:ख होतंय. दरम्यान, या व्हिडिओवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.