Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनसेचा Airtel ला दणका; कार्यकर्त्यांची मुंबईतील एअरटेल कार्यालयावर धडक, काय आहे प्रकार?

मनसेचा Airtel ला दणका; कार्यकर्त्यांची मुंबईतील एअरटेल कार्यालयावर धडक, काय आहे प्रकार?


मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला केवळ मराठी असल्याने घर नाकारल्यानंतर महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला असून मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असले प्रकार पुन्हा घडल्यास गालावर वळ उठतील असा इशारा दिला होता. आता आता मराठीच्या मुद्द्यावरुन मनसेने एअरटेलला दणका दिला आहे.

दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये वाद सुरू असताना आता एअरटेलच्या गुजराती जाहिरातीने मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात गुजराती भाषेत जाहिराती करता, गुजरातमध्ये मराठी भाषेत जाहिराती देणार का? असा सवाल मनसेने एअरटेलला विचारला आहे. मनसेच्या धडक मोर्चानंतर एअरटेलने माफीनामा दिला.

मुलुंड प्रकरणानंतर मनसे आक्रमक झाली असून त्यात एअरटेलने मुंबईत गुजराती भाषेत जाहिरात केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मालाडच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मनसेचे विद्यार्थी संघटनेचे नेते अखिल चित्रे, सतीश नारकर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी मालाड पश्चिमेकडे असलेल्या भारती एअरटेल कंपनीवर धडक दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त देखील तैनात केला होता. मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरल्यानं काही काळ वातावरण तनावपूर्ण झालं होती. यावेळी पोलिसांशी बाचाबाची देखील झाली.

महाराष्ट्रात गुजराती भाषेत जाहिरात देणाऱ्या एअरटेलला मनसेने इशारा दिला आहे.मनसे पदाधिकाऱ्यांनी एअरटेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत माफी मागण्यास सांगितले. त्याचबरोबर गुजराती भाषेतील जाहिरात तत्काळ हटवण्याची मागणी केली. एअरटेलने देखील वादग्रस्त जाहिरात सर्व सोशल प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकू, पुन्हा अशी चूक होणार नाही, असं आश्वासन दिलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.