Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सागंली जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान32 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान

सागंली जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान32 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान

 सांगली : राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 94 आहे. तर सदस्य पदाच्या 29 व सरपंच पदाच्या 3 अशा एकूण 32 रिक्त जागांसाठी पोट निवडणूक असलेल्या ग्रामपंचायती 26 आहेत.

निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहील. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.