Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यभरात ईडीचे छापे; 70 मालमत्ता जप्त अंदाजे 315 कोटींची आहे

राज्यभरात ईडीचे छापे; 70 मालमत्ता जप्त  अंदाजे 315 कोटींची आहे 


मुंबई : राज्यभरामध्ये ईडीची मोठी कारवाई सुरु आहे. ईडीने केलेल्या कारवाईमध्ये ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून मालमत्तांची किंमत अंदाजे ३१५ कोटी आहे. आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ही जप्ती करण्यात आली आहे. ईडीने मुंबई, ठाणे, जळगाव, सिल्लोड आणि कच्छमधील ७० स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पीएमएलए, २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. आरएल गोल्ड, राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी आणि आहे.

इतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश आहे. ईडीने नाशिक, जळगाव आणि ठाणे (महाराष्ट्र) येथील राजमल लखीचंद समूहाच्या १३ ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीत गुन्हेगारी कागदपत्रांसह सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने/सराफा आणि भारतीय चलन जप्त करण्यात आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.