यंदा विवाहसाठी 66 मुहूर्त; मागील वर्षापेक्षा अधिक तारखा
तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्यांना सुरुवात केली जाते. यंदा अधिक मासामुळे दिवाळी लांबल्याने लग्न मुहूर्तही लांबले आहेत. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून अनेक मुहूर्त असून विवाह हंगामाचा श्रीगणेशा नोव्हेंबर महिन्यापासून होणार आहे.
यंदा दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये तीन मुहूर्तांनी लग्न सोहळ्यांना सुरवात होत आहे. नोव्हेंबर २०२३ त जुलै २०२४ या कालावधीत ६६ लग्न मुहूर्त आले आहेत. मागील वर्षीपक्षा यंदा मुहूर्त अधिक आले आहेत. ४४ गोरज मुहूर्ताचा वाढवा देखील आला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर लग्नाचा बॅण्ड वाजणार आहे. मात्र, वैशाखमध्ये लग्न करू इच्छिणाऱ्यांना यंदा या एकही मुहूर्त उपलब्ध नाही.
खऱ्या अर्थाने विवाह मुहूर्ताचा श्रीगणेशा हा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात २७, २८, २९ या तारखांना विवाह मुहूर्त होणार आहे. डिसेंबरमध्ये ६,८,१५,१७,२०,२१,२५, २६ आणि ३१ तर जानेवारी २०२४ मध्ये २, ६, ८, १७, २२, २७, २९, ३० आणि ३१ या तारखांना विवाह मुहूर्त आहे. वैशाख महिन्यात जास्त शुभ मुहूर्त आहे.
यावर्षी ३ मे २०२४ ते २८ जून २०२४ पर्यंत लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. त्यामुळे ५६ दिवस मंगल कार्यालये तसेच लग्नकार्याशी संबंधित व्यावसायिकांना घरी बसून राहण्याची वेळ येणार आहे. परिणामी नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत लग्नाचे एकूण ६६ मुहूर्त आहे.
मागील वर्षापेक्षा आठ अधिक मुहूर्त
वर्षापेक्षा यंदा आठ मुहूर्त अधिक असून वधू-वराकडील मंडळींची लगबग सुरू झाली असून मंगल कार्यालयांचे बुकिंग करण्याची कामे सुरू झाली आहेत. तर काही लोकांना गोरज मुहूर्तावर लग्न करण्याची इच्छा असते. अशांसाठी नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ मध्ये एकूण ४४ गोरज मुहूर्त आले आहेत. परिणामी दिवाळीनंतर लग्नाची धामधूम सुरू होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.