Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक 'चमत्कारिक' औषध घेतले आणि 6 महिन्यातच कॅन्सर मुक्त झाली ही महिला

एक 'चमत्कारिक' औषध घेतले आणि 6 महिन्यातच कॅन्सर मुक्त झाली ही महिला 


कॅन्सर असा आजार तो सुरुवातीच्या टप्प्यात समजत नाही. जेव्हा त्याचं निदान होतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कॅन्सर शेवटच्या टप्प्यातही पोहोचलेला असतो. अशावेळी कॅन्सरपासून मुक्ती मिळवणं कठीण होतं.

कॅन्सरवर इतके उपचार असूनही मग कॅन्सरग्रस्त व्यक्तीचा जीव वाचणंही शक्य होत नाही. पण सध्या एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आलं आहे. एक महिला जी कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजला होती. फक्त एका औषधाने 6 महिन्यात ती कॅन्सरमुक्त झाली आहे.

केरी डाऊनी असं या महिलेचं नाव आहे. यूकेत राहणाऱ्या 42 वर्षी केरीला एक वर्षापूर्वी कॅन्सरचं नदान झालं होतं. तिला आतड्यांचा कॅन्सर होता. कॅन्सरचा तिसरा टप्पा होता. तिला स्वानसी येथील सिंगलटन हॉस्पिटलमधील ऑन्कोलॉजिस्ट डॉ क्रेग बॅरिंग्टन यांच्याकडे पाठवण्यात आलं. त्यांनी तिला एक औषध दिलं. ते तिनं सहा महिने घेतलं. कॅन्सर म्हटलं की अनेक लोक जगण्याची आशाच सोडतात. पण केरीसोबत चमत्कार घडला. तिला डॉक्टरांनी दिलेलं हे औषध चमत्कारिक ठरलं. सहा महिन्यांतच तिचा कॅन्सर बरा झाला.

स्वानसी बे युनिव्हर्सिटी हेल्थ बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार तिला डॉस्टारलिमॅब इन्फ्युजन देण्यात आलं. हा इम्युनोथेरपीचा एक प्रकार आहे, जो रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाचा नाश करण्यास मदत करतो. याच्या क्लिनिकल चाचण्या होत आहेत. हे औषध दिल्यानंतर सर्जरी, रेडिओथेरपी किंवा केमोथेरपी टाळता येते. केरीला औषध दिल्यानंतर चाचण्यांमध्ये तिचा कर्करोग पूर्णपणे बरा झाल्याचं दिसून आलं.

केरी म्हणाली, 'मी थकले होते. शरीरावर सर्वत्र पुरळ आला होता. पण केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा शस्त्रक्रियेच्या तुलनेत ते काहीच नव्हतं. उपचारादरम्यान, स्कॅनमध्ये असं दिसून आलं ट्यूमर लक्षणीयरीत्या कमी झाला होता आणि अखेरीस कॅन्सर पूर्णपणे नष्ट झाला", डॉक्टरांचेही तिने आभार मानले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.