Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाघ- बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन

वाघ- बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन

वाघ बकरी चहाचे संचालक आणि मालक पराग देसाई यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येतेय. पराग देसाई यांचे वय अवघे 49 वर्ष होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते अनेक दिवसांपासून व्हेटिंलेटरवर होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले आहे. 

मागील आठवड्यात मॉर्निंक वॉकसाठी जात असताना त्यांचा छोटासा अपघात झाला होता. वॉकवर जात असताना ते खाली पडले होते. त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे ब्रेन हॅमरेज झाल्याचे घोषित केले होते. मात्र, त्यांचा प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग गेल्या एक आठवड्यापासून रुग्णालयात होते व त्यांच्यावर उपचार सुरू होते.


पराग देसाई हे वाघ बकरी चहा कंपनीच्या 6 ग्रुप ऑफ डायरेक्टरपैकी एक होते. ते कंपनीक एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर या पदावर कार्यरत होते. त्यांनी अमेरिकेतील लाँग आयडँड युनिव्हर्सटीतून एमबीए केले होते. वाघ बकरी कंपनीसाठी त्यांनी मार्केटिंग, सेल्स आणि एक्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर ते टी एक्सपर्टदेखील होते.

वाघ बकरी चहा ग्रुप त्यांच्या प्रिमियम चहासाठी खूप लोकप्रिय आहे. 1892 रोजी कंपनीची स्थापना झाली होती. सध्या कंपनीचा टर्नओव्हर दोन हजार कोटींहून अधिक आहे. वाघ बकरी चहाचे वितरण जवळपास 50 मिलियन किलो इतके होते. कंपनीने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, गोवा पंजाब, चंदीगढ यासह अनेक इतर राज्यांतही व्यापार सुरू केला आहे. त्याचबरोबर जगभरातील 60 देशांमध्ये वाघ-बकरी चहा निर्यात केले जाते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.