सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा 43 जणांन अटक
सांगली, ता. २ ः कोल्हापूर रस्त्यावरील हरिप्रसा इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर चालणाऱ्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी काल छापा मारला. अड्डा चालवणाऱ्यांसह जुगार खेळणाऱ्या ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा छापा मारला. त्यात ग्रामीण आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
अधिक माहिती अशी, की जुगार, मटक्यासह अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर विभागाचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकात ग्रामीण आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. काल दुपारी पथक गस्तीवर होते. त्यावेळी कोल्हापूर रस्त्यावरील गोपाळ पवार यांच्या मालकीच्या हरिप्रसाद इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने काल दुपारी सव्वाचारच्या सुमारास छापा टाकला. ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाई करण्यात आलेल्यामध्ये संशयित महम्मद हनिफ गनी जमादार (५१, रा. यशवंतनगर), संजय संभाजी खंडागळे (५१, रा. शंभर फुटी रस्ता), प्रदीप बाळासो मदने (३२, सिद्धार्थनगर नांद्रे), यासीन सलिम मुल्ला (२६, पाटणे प्लॉट, सांगली), आल्ताफ हानिफ मुजावर (२६, रा. मारूती रस्ता), जब्बारभाई मेहबुब मणेर (६४, रा. मंगळवार पेठ, मिरज), पंडित आनंद रसाळे (५३, रा. मांजरी, ता. चिक्कोडी, कर्नाटक), शकील हुसेन कोतवाल (५३, रा. नागारजी गल्ली), मनोहर कृष्णाजी पवार (३५, दक्षिण शिवाजीनगर), मनोज बापगोंडा पाटील (४८, रा. शिरोळ), राजेश विलास शेलार (३९, जामवाडी), संजय परसु नाईक (३९, शामरावनगर), उमर फारूख मन्सुर (४९, रा. जयसिंगपूर), गणेश महादेव कांबळे (५०, रा. पाटणे प्लॉट), प्रमोद बापु वाघमारे (४३, रा. शाम हौसिंग सोसायटी, सांगली), प्रकाश सुखदेव माने (५०, रा. मिरज), वासुदेव शंकर पारस (४५, रा. जमखंडी, कर्नाटक), मुसा मिरा माणीपुर तेरदाळ (३८, रा. तेरदाळ, कर्नाटक), दस्तगीर नबीलाल लतीफ (६२, रा. कवठेमहांकाळ), रघुनात विठ्ठल दींडे (४९, रा. कवठेमहांकाळ), नासीर करीम जमादार (४५, रा. कुपवाड रोड), प्रशांत अण्णासो पवार (४२, रा. कवठेपिरान), सुरेश रघुनाथ शिंपी (५०, रा. शामरावनगर), उदयसिंह बाबुराव जाधव (४२), प्रकाश भाऊसो पाटील (५८, दोघे रा. कवटेपिरान), उस्मान खुदबुद्दीन मगदुम (६९, रा. खणभाग), भारत धनपाल मुलगलाडे (४८, रा. जयसिंगपूर), वाहीद आलीशान नाईकवडी (२६, रा. हरिपूर रस्ता), राजु भोपाळ मोगलाळे (४९, नांदणी, शिरोळ), रफीक नुरमहंमद जमादार (५४, यशवंतनगर), गुलाब राजू शेख (६० रा. खणभाग), समशेर कादेर पेंढारी (५९, जयसिंगपूर), शब्बीर दस्तगीर जमादार (वय ४०, रा. कवठेपिरान), विनायक विष्णु पाटील (४०, जयसिंगपूर), धोंडिराम उत्तम तावदरकर (३२, पंचमुखी मारूती रस्ता), रणजीत लक्ष्मण सूर्यवंशी (५०, रा. मिरज), नजीर रसुल मुजावर (७२, रा. कवठेमहांकाळ), विराप्पा लक्ष्मण कल्लोळी (४३, रा. माळवाडी), झाकीर गनी जमादार (५४, रा. यशवंतनगर), महावीर बाबु चव्हाण (५१), अनिल बाबु माळगाळे (४७, दोघे रा. उमरवाळ, शिरोळ), पोपट चंद्रकांत आवळे (४३, रा. बेडग), मुदसर रफीक मिस्त्री (३६, रा. फौजदार गल्ली) यांचा त्यात समावेश आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे अंमलदार शिवाजी ठोकळ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ च्या कलम ४ आणि ५ प्रमाणे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.उपनिरीक्षक महादेव पोवार अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.