Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फक्त 400 रुपयांत मिळेल गॅस सिलेंडर, तुम्हाला मिळणार की नाही?

फक्त 400 रुपयांत मिळेल गॅस सिलेंडर, तुम्हाला मिळणार की नाही?


नवी दिल्ली : गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या तर सर्वसामान्यांना खूप आनंद होतो. अशा वेळी फक्त 400 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळत असेल तर मग महिलांचा आनंद विचारायलाच नको. दरम्यान फक्त 400 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार असे वृत्त आहे.

मात्र हे सिलेंडर कोणत्या राज्यातील लोकांना मिळणार हे आपण पाहणार आहोत. खरंतर तेलंगणामध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पक्ष जनतेला आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. याच क्रमात भारत राष्ट्र समितीने (BRS) आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत.


भारत राष्ट्र समितीने सत्तेत आल्यास बीआरएसने गरीब महिलांना 3,000 रुपयांची आर्थिक मदत, 400 रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर, प्रत्येक बीपीएल कुटुंबाला 5 लाख रुपयांचा विमा, सामाजिक सुरक्षा पेन्शनमध्ये वाढ आणि शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक मदत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. सलग तिसर्‍यांदा सत्तेत येण्याचे लक्ष्य ठेवून, बीआरएसने सहा गॅरंटी अंतर्गत काँग्रेसने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या आश्वासनांपेक्षा अधिक आश्वासने दिली आहेत. काँग्रेसने प्रत्येक महिलेला 2,500 रुपये आणि एलपीजी सिलिंडर 500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये प्रति एकर आर्थिक मदत आणि विविध लाभार्थ्यांना 4,000 रुपये मासिक सामाजिक सुरक्षा पेन्शन देण्याचे आश्वासन दिले होते.


दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) महिलांना सौभाग्य लक्ष्मी योजनेंतर्गत मासिक 3,000 रुपयांची आर्थिक मदत मिळेल, असे आश्वासन बीआरएसने दिले. बीआरएसचा निवडणूक जाहीरनामा रविवारी प्रसिद्ध करताना बीआरएसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना 400 रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. आसरा पेन्शन अंतर्गत, लाभार्थ्यांच्या विविध श्रेणीतील सामाजिक सुरक्षा पेन्शन सध्याच्या 2,016 रुपयांवरून पाच वर्षांत 5,000 रुपये करण्यात येईल. मार्च 2024 नंतर पेन्शनची रक्कम 3,016 रुपये आणि पाचव्या वर्षी ती 5,000 रुपये केली जाईल.

शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठीचे पेन्शन सध्याच्या 4,016 रुपयांवरून पुढील पाच वर्षांत 6,016 रुपये करण्यात येणार आहे. मार्च 2024 नंतर ही रक्कम 5,000 रुपयांपर्यंत वाढवली जाईल आणि ती दरवर्षी 300 रुपयांनी वाढवली जाईल. KCR ने सर्व BPL कुटुंबांसाठी विमा योजनाची देखील घोषणा केली. 'केसीआर विमा' योजनेत 93 लाख कुटुंबांचा समावेश असेल. सरकार प्रत्येक कुटुंबासाठी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ला 3,600 ते 4,000 रुपये प्रीमियम भरणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.