Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 3 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 3 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


सांगली, दि. 27  : ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरीपूर्वी 5 वर्षे नियमित सेवा पूर्ण झाली असून गैरहजर कालावधी 5 वर्षापेक्षा कमी आहे, अशा गट-अ (एस-20) या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आयुक्तालय स्तरावरुन दि. 7 नोव्हेंबर 2023 पासून समुपदेशन प्रक्रिया राबवून शासन सेवेत रुजू करुन घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी दि. 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत संबंधित उपसंचालक यांच्याकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन  कोल्हापूर मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे (कलकुटे) यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

वैद्यकिय अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता असल्याने आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (वेतनस्तर एस-20- 56100-177500) या संवर्गातील विविध कारणास्तव अनधिकृत गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन सेवेत रुजू करुन घेण्याची संधी देण्यासाठी संबंधितांकडून अर्ज मागविण्यात आल्याचे डॉ. कांबळे यांनी पत्रकात कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.