Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव; 3 महिलांवर लैंगिक अत्याचार, मुंबईतील डॉक्टरला अटक

प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव; 3 महिलांवर लैंगिक अत्याचार, मुंबईतील डॉक्टरला अटक 


मुंबई : तीन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली मुंबईतल्या मालवणी भागातल्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. योगेश सुनील भद्र भानुशाली असं या डॉक्टरचं नाव असून तो 33 वर्षांचा आहे. 21 वर्षीय तरुणीने डॉक्टरबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केली, यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. डॉक्टर भानुशालीवर 21 ते 24 वर्ष वयाच्या आणखी दोन महिलांनी आरोप केले आहेत. लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या महिलांनी डॉक्टरवर केला आहे.

आरोपी डॉक्टरने पीडितेच्या शरिरावर त्याचं नाव गोंदवून घेतलं आणि लग्नाचे वचन देऊन त्यांच्यासोबत हेराफेरी केली, असा दावा वकिलाने केला आहे. एका पीडित तरुणीने तिच्या प्रायव्हेट पार्टवर डॉक्टरचं नाव गोंदवून घेतल्याचंही वकिलांचं म्हणणं आहे.

21 वर्षीय तरुणीने दाखल केलेल्या प्राथमिक तक्रारीमुळे डॉ. भानुशालीला 29 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर, मालवणी पोलिसांनी आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल केला, ज्यात आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप 23 वर्षीय तरुणीने केला, तसंच लग्नाच्या बहाण्याने तिच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये घेतले.

मालवणी येथे घर असलेल्या डॉक्टरने या सर्व महिलांशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री केली होती, असे पोलिसांनी सांगितले. 21 वर्षीय तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात खुलासा केला की, सुरुवातीला ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून डॉक्टरांशी जोडली गेली होती आणि त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. तिने दावा केला की डॉक्टरांनी तिला त्याच्या घरी भेटायला सांगितले आणि तो तिची आपल्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देईल असा दावा केला.

डॉक्टरने त्याच्या राहत्या घरी, त्याने एका छोट्याशा लग्नाचे आयोजन केले, अगदी तिच्या गळ्यात मंगळसूत्रही घातले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसंच तिच्याकडून 60 हजार रुपये उसने घेतले. तिने दावा केला की त्यांचे संबंध काही काळ चालू राहिले परंतु नंतर डॉक्टरांनी अचानक तिच्याशी सर्व संपर्क तोडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गेल्या महिन्यात मालवणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

23 वर्षीय तरुणीने सांगितले की, मागील वर्षी तिची इन्स्टाग्रामवर डॉ. भानुशालीशी मैत्रीही झाली होती. त्यांनी संपर्क क्रमांकांची देवाणघेवाण केली आणि चॅटिंग सुरू केले. त्याने लग्नाचे वचन दिले आणि तिची त्याच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली. तिने अनेक वेळा त्याच्या निवासस्थानी भेट दिली, जिथे त्याने आपल्यावर बलात्कार केला आणि वैयक्तिक गरजा सांगून रोख रक्कम आणि सोन्याची चेनही घेतली, असं पीडित तरुणीने तक्रारीमध्ये म्हणलं आहे.

पीडित तरुणी जेव्हा न्यायालयात भेटल्या तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. आरोपी डॉक्टरने दुसऱ्या पीडितेला तक्रार न करण्याची विनंती केली, पण मुलींनी मात्र त्याची ही विनंती मान्य केली नाही. आणखी मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून रोखण्यासाठी डॉक्टरला तुरुंगात टाकावं, अशी मागणी पीडितांनी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.