Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गावभर होर्डींग्ज लावणं भोवल; पुनीत बालन यांना पुणे महापालिकेने 3 कोटी 20 लाखांचा दंड, 2 दिवसात भरा नाही तर......

गावभर होर्डींग्ज लावणं भोवल; पुनीत बालन यांना पुणे महापालिकेने 3 कोटी 20 लाखांचा दंड, 2 दिवसात भरा नाही तर......


पुणे : पुण्यातील उद्योजक पुनित बालन यांना पुणे महापालिकेकडून शहरभर अनधिकृत होर्डिग्ज लावल्याबद्दल 3 कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बालन यांनी पुण्यातील गणेश मंडळांना प्रचंड प्रमाणात देणग्या दिल्याने गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात पुनित बालन आणि त्यांच्या मिनरल वॉटर ब्रॅण्डचे संपूर्ण शहरात फ्लेक्स लावण्यात आले होते. पुनित बालन यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात झळकणाऱ्या फोटोंची पुण्यातील गणेशोत्सवात चर्चा होती. मात्र याच फ्लेक्स आणि फोटोंना अनधिकृत ठरवून महापालिकेने त्यांना तीन कोटी वीस लाखांचा दंड ठोठावला आहे.

आपण परदेशात असून पुणे महापालिकेने पाठवलेल्या नोटिशीबद्दल आपल्याला काही माहिती नाही, त्याची माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ असं पुनित बालन यांनी स्पष्ट केलंय. पुनित बालन यांनी लावलेल्या अनधिकृत जाहिराती पुणेकरांमध्ये वादाचा मुद्दा बनला आहेत. विशेषत: त्यांनी ऐतिहासिक शनिवारवाडा परिसराच्या दर्शनाला अडथळा निर्माण केला आहे. अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडेही अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्याने तातडीने प्रशासकीय कारवाई करण्यात आली.

अनेक वर्षांपासून पुनित बालन पुण्यातील विविध दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांना आर्थिक मदत करतात. या बदल्यात या मंडळांनी त्यांच्या भागात बालनच्या ऑक्सिरिच पाण्याच्या बाटल्यांचे ब्रँडिंग करण्यास परवानगी दिली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात जवळपास प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर या जाहिराती लावण्यात आल्या होत्या. शहरभर लावण्यात आलेले हे फ्लेक्स अनेकदा चर्चेचा आणि गमतीचा विषय ठरल्या आहेत. सोशल मीडियावर देखील अनेक मीम व्हायरल झाले आहे.

संपूर्ण मध्यवर्ती भागात त्यांचेच फ्लेक्स दिसत असल्यामुळे या उत्सवात विविधता उरली नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आर्थिक मदत मिळत असल्याने गणेश मंडळं हे फ्लेक्स लावत असल्याचं त्यांचे समर्थक सांगतात. महाराष्ट्र राज्य सरकारने गणेशोत्सव काळात जाहिरातींचे शुल्क माफ केले असले तरी दहीहंडी उत्सवासाठी परवानगी आवश्यक होती. 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान, बालनच्या कंपनीची जाहिरात करणारे अंदाजे 2,500 फलक पुणे शहरातील रस्त्यांवर लावण्यात आले होते. प्रत्येक पॅनेल किमान चार बाय आठ फूट मोजले. प्रति पॅनेल 40 रुपये दैनंदिन शुल्काच्या आधारे दंडाची गणना करून पीएमसीने 3.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बालनला दंड भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.निर्धारित वेळेत पैसे न भरल्यास त्याच्या मालमत्ता करातून रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.