Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्लेसमेंट ड्राईव्ह 26 ऑक्टोबरला

प्लेसमेंट ड्राईव्ह 26 ऑक्टोबरला


सांगली दि. 16 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी रिक्त पदांसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर अर्ज करून मुलाखतीसाठी 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंदाचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.

खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठे उद्योजक, कारखाने व हॉस्पीटल यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले असून या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये एकूण 7 विविध खाजगी नामवंत कंपन्या व हॉस्पीटल सहभागी होणार आहेत. यामध्ये एकूण 165 जागा भरण्यात येणार असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.