Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

22 ऑक्टोबर च्या मोर्चात शिक्षण संस्था ताकदीने उतरणार ; रावसाहेब पाटील

22 ऑक्टोबर च्या मोर्चात शिक्षण संस्था ताकदीने उतरणार ; रावसाहेब पाटील



सांगली दि. 12: शासकीय / निमशासकीय कर्मचारी, शाळा/ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी पद्धतीने नोकर भरती, कमी पट संख्येच्या शाळा बंद करून समूह शाळा योजना व शाळा नामकरण नावाखाली सरकारी शाळा उद्योगपती व धनिकांच्या घरात घालून महाराष्ट्राचे शिक्षण क्षेत्र उध्वस्त करणारे शासन निर्णय तातडीने रद्द व्हावेत यासाठी सांगलीत दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी कलेक्टर ऑफिसवर भव्य असा विराट मोर्चा निघणार आहे.


त्यामध्ये पेन्शन मोर्चा सामील झाले तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, संचालक सदस्य, बालवाडीपासून पदव्युत्तर विभागापर्यंत शिक्षक / शिक्षकेतर सेवक विद्यार्थी व पालक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत.

दि. 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता पुष्पराज चौकातून कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास प्रारंभ होईल. राम मंदिर, काँग्रेस भवन ते स्टेशन चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर होईल अशी माहिती शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली आहे आज त्यांच्या निवासस्थानी मोर्चातील सहभागाविषयी नियोजन करण्यासाठी संघाची बैठक झाली. त्यामध्ये शासनाच्या खाजगीकरण कंत्राटीकरण व शाळा बंद धोरणाला संस्थाचालकांनी जोरदार विरोध करून शासनाचा निषेध केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शालेय शिक्षण व उच्च शिक्षण मंत्री व सांगलीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन शासन निर्णय रद्दची मागणी करावी असा ठराव संमत केल्याची केल्याचेही पाटील म्हणाले

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.