Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाजगीकरण व कंत्राटीकारण विरोधी 22 ऑक्टोबरच्या मोर्चाला लाखोंच्या संख्येने सहकुटुंब सामील व्हा ;चंद्रशेखर क्षीरसागर

खाजगीकरण व कंत्राटीकारण विरोधी 22 ऑक्टोबरच्या मोर्चाला लाखोंच्या संख्येने सहकुटुंब सामील व्हा ;चंद्रशेखर क्षीरसागर


सांगली:  कंत्राटीकरण व खासगीकरण विरोधात सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर 22 ऑक्टोबरच्या रोजी भव्य मोर्चा सामील होण्याचे आवाहन प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांनी केले आहे.हा मोर्चा विविध सामाजिक,राजकीय,विद्यार्थी,कर्मचारी संघटना,विद्यार्थी,पालक,सुशिक्षित बेरोजगार,सामाजिक संघटना  एकत्र होत चुकीच्या धोरणाना संविधानिक मार्गाने विरोध करणार आहेत.या मोर्चाचे नेतृत्व आमदार अरुण लाड करणार आहेत.भविष्यातील धोके ओळखून सर्वांनी एकजूट दाखवत आंदोलनात सहभागी होत कंत्राटीकरण खाजगीकरण थांबवण्यासाठी आणि शिक्षण, भावी पिढी आणि  देश वाचवण्यासाठी,आपल्या अस्तित्वासाठी या लढ्यात सामील होण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

इस्लामपूर येथे मोर्च्याच्या नियोजन संदर्भातील बैठकीत बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की समूह शाळा निर्माण करून सर्वसामान्य व गोरगरिबांच्या मुलाबाळांचे शिक्षण थांबवण्याचा कुटील डाव आपण हाणून पडायला हवा.कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यायला नको म्हणून हे सर्व चालले आहे.शाळा खाजगी कंपन्यांना दत्तक देणे हे कशाचे लक्षण आहे.जनतेचे कल्याण हाच सरकारचा मुख्य हेतू असावा असे भारतीय राज्यघटना सांगते. मात्र सर्वत्र खाजगीकरण करणारे हे सरकार आहे की व्यापारी याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.