Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2023 :मतदान केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2023 :मतदान केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी


ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2023 : मतदान केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

सांगली, दि. 31 : सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2023 चे मतदान दि. 5 नोवेंबर 2023 रोजी होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, शांतता रहावी तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील एकूण 367 सर्व मतदान केंद्राच्या इमारतीपासून 200 मीटर सभोवतालच्या परिसरात  दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान संपेपर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.

आदेशात म्हटले आहे, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. झेरॉक्स मशीन टेलिफोन बूथ, फॅक्स मशीन ध्वनीक्षेपक या संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली आहे. तसेच मतदान केंद्रात मोबाईल, पेजर वापरण्यास मनाई केली आहे.  हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावीत असणाऱ्या शासकीय कर्मचारी / अधिकारी यांना लागू असणार नाही. हा आदेश दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.