Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मित्राला उसने दिले 2 हजार आणि खात्यात आले तब्बल 753 कोटी

मित्राला उसने दिले 2 हजार आणि खात्यात आले तब्बल 753 कोटी

सध्या सर्वसामान्यांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये अचानक जमा झाल्याची प्रकरणं समोर येत आहेत. याच दरम्यान आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे, जिथे एका व्यक्तीने आपल्या मित्राला दोन हजार रुपये उधार म्हणून पाठवले आणि त्याने खातं तपासताच त्याला मोठा धक्काच बसला. कारण त्याच्या खात्यात तब्बल 753 कोटी रुपये असल्याचं दिसत होतं.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, मोहम्मद इदरिससोबत ही हैराण करणारी घटना घडली आहे. मोहम्मद इदरिस हा फार्मसीमध्ये काम करतो. इदरिसने सांगितलं की, त्याने कोटक महिंद्रा बँकेतून त्याच्या मित्राला 2,000 रुपये ट्रान्सफर केले होते. त्यानंतर त्याने त्यांच्या खात्यातील रक्कम तपासली असता खात्यात 753 कोटी रुपये दिसत होते.


इदरिसने त्यानंतर त्याच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधला असता त्याचं खातं फ्रीज करण्यात आलं. एवढी मोठी रक्कम खात्यात जमा झाल्याची तामिळनाडूतील ही तिसरी घटना आहे. याआधी राजकुमार नावाच्या कॅब ड्रायव्हरच्या खात्यात चुकून 9 हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाले होते.

राजकुमारने त्याच्या मर्केंटाइल बँकेला याबाबत माहिती दिली असता, चुकून 9 हजार कोटी रुपये खात्यात ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. यानंतर बँकेने कॅब चालक राजकुमारच्या खात्यातून ही मोठी रक्कम ट्रान्सफर केली होती. याशिवाय तंजावरचा रहिवासी असलेल्या गणेशन नावाच्या व्यक्तीसोबत अशीच एक घटना घडली होती, जेव्हा त्याच्या खात्यात 756 कोटी रुपये आले, तेव्हा तिला धक्काच बसला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.