Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली विधानसभा मतदार संघात चार वर्षात 2 हजार 650 कोटीची विकासकामे मंजूर केली. आ सुधीरदादा गाडगीळ

सांगली विधानसभा मतदार संघात चार वर्षात 2 हजार 650 कोटीची विकासकामे मंजूर केली. आ सुधीरदादा गाडगीळ


सांगली : सांगली विधानसभा मतदार संघामध्ये नऊ वर्षामध्ये आपल्यावर अनेकवेळा आरोप करण्यात आले, मात्र आरोपांना मी कधी प्रत्त्युत्तर दिले नाही. यापुढेही विरोधकांच्या  आरोपांवर काही बोलणार नसून विकासकामांच्या माध्यमातून काम करीत राहणार आहे,  विधानसभेला सलग दुसर्‍यांदा लोकांनी संधी दिल्यानंतर गेल्या चार वर्षात 2 हजार 650 कोटीची विकासकामे मंजूर केली. बहुतांशी कामे पूर्ण झाली, काही दिवाळीनंतर   सुरु होतील अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी पत्रकार बैठकीत दिली.


यावेळी भाजपाचे नेते शेखर इनामदार,शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, माजी नगरसेवक संजय कुलकर्णी  गणपतराव साळुंखे, अमोल कणसे, आदी उपस्थित होते. मागील चार वर्षात केलेल्या विकासकामांबाबतची माहिती आमदार गाडगीळ यांनी दिली. ते म्हणाले, राजकारणामध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतात. अनेकवेळा माझ्यावर आरोप झाले, परंतु प्रत्त्युत्तर दिले नाही. यापुढेही विरोधकांबाबत बोलणार नाही. ज्यांनी मला संधी दिली, त्यांच्यासाठी काम करण्याचे टार्गेट आहे.

मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले जात आहेत. राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून चार वर्षामध्ये 2 हजार 650 कोटी रुपयांची कामे मंजूर केली. बहुतांशी कामे मार्गी लागली, तर काही कामे सुरु आहेत. जी कामे प्रलंबित आहेत, ती दिवाळीनंतर सुरु होतील. सांगलीमध्ये पाचशे बेडच्या रुग्णालयाच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून डिझाईन तयार आहे. दिवाळीनंतर काम सुरु होईल. सांगली-पेठ रस्त्याच्या कामाची निविदा निश्चित झाली आहे, त्याबाबतची कार्यवाही सुरु असून जानेवारी काम सुरु होईल.

सांगली शासकीय रुग्णालयाच्या खुल्या जागेत शंभर बेडच्या रुग्णालय उभारणीसाठी 45.40 कोटी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातून शंभर बेडच्या रुग्णालयासाठी 32.45 कोटी असे एकूण 77.85 कोटी मंजूर झाले आहेत. सिव्हील हॉस्पिटलच्या खुल्या जागेत मंजूर असलेले मिरज येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या नवजात शिशू रुग्णालय बांधकामास 46.74 कोटी मंजूर आहेत. आमदार निधीतून 2019 मध्ये 2.85 कोटी, 2020-21 मध्ये 3.6 कोटी तसेच 2021-22 मध्ये 4.18 कोटी अशी एकूण 9.36 कोटींची कामे झाली. निधीतून रस्ते डांबरीकरण व गटर बांधकाम, सामाजिक सभागृह तसेच पथदिव्यांची कामे करण्यात आली. कोविड काळात सिव्हील हॉस्पिटल व महापालिका रुग्णालयास प्रत्येकी 17 लाखांची रुग्णवाहिका, सिव्हील हॉस्पिटलमध्ये 90 लाखांचा ऑक्सिजन प्लांट तयार झाला आहे.

2023-24 अर्थसंकल्पिय अधिवेशनात 191 कोटी कामे, 2515 योजनेतून मतदारसंघातील गावांसाठी 11 कोटी, जिल्हा नियोजन समितीतून 8.4 कोटी, पावसाळी अधिवेशनामध्ये नवीन रस्ते, रस्ते रुंदीकरणासाठी 55 कोटी, नाबार्डच्या माध्यमातून 14 कोटी 18 लाख, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 23 कोटी 66 लाख, जलजीवन मिशन योजनेंतर्गत 2.50 कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेतून 9.60 कोटी मंजूर केले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रलंबित शेरी नाल्यास 60 निधी मंजूर केला आहे. मलनिस्सारण प्रकल्पास 253 कोटी, सांगलीत अत्याधुनिक नाट्यगृहासाठी 25 कोटी मंजूर केले. हरीपूर-कोथळी पूल 32 कोटी, आयर्विन समांतर पूल 35 कोटी, खातेवाडीजवळ लहान पूल, माधवनगरजवळ लहान पूल, जुना बुधगाव रोडवरील रेल्वे ओवर पुलाच्या बांधकामासाठी 70 कोटी मंजूर केले असे आमदार  गाडगीळ यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.