Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली येथील चांदणी चौक वार्ड क्रमांक 17 मधील नागरीक व शाळकरी मुलांनी रस्त्याला बोंबलून श्रद्धांजली वाहिली; आयुक्तांचे दुर्लक्ष


सांगली येथील चांदणी चौक वार्ड क्रमांक 17 मधील नागरीक व शाळकरी मुलांनी रस्त्याला बोंबलून श्रद्धांजली वाहिली; आयुक्तांचे दुर्लक्ष 


सांगली येथील चांदणी चौक , दामानी हायस्कूल ते शिवेच्छा हॉटेल रस्ता गेले सहा महिने उकरून टाकला आहे.  सहा महिने झाले रस्ता मृत्यू पाहून. म्हणून रस्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या रस्त्यावरील दामानी हायस्कूल व परिसरातील सर्व नागरिकांना गेले सहा महिने गटारीच्या पाण्यातून, चिखलातून, खाचखळग्याच्या उकडलेल्या रस्त्यातून ये जा करावी लागत आहे .तत्कालीन महापौर व सर्व नगरसेवकांना वारंवार सांगून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. काही दिवसापूर्वी गणपती सुद्धा गटारीच्या पाण्यात, खड्ड्यातच बसवण्यात आले होते. प्रशासकीय कालखंडात सुद्धा या रस्त्याकडे कोणी पाहिले नाही. ठेकेदाराने काम बंद केले आहे .याचा संताप व्यक्त करत वार्ड क्रमांक 17 मधील नागरीक महिला व शाळेच्या मुलांनी वार्डाला व रस्त्याला, सर्व प्रशासकीय अधिकारी नागरिकांना, पुढार्‍यांना श्रद्धांजली वाहत, सहा महिने झाले रस्ता मेला आहे .कुठे गेला असा संताप व्यक्त केला आहे. वार्ड क्रमांक 17 ला श्रद्धांजली व ह्या रस्त्याला बोंबलून, श्रद्धांजली वाहत बोर्डाचा अनावरण केल्याने सांगलीमध्ये एक चर्चेचा विषय ठरला आहे.




 वार्ड क्रमांक 17 तील सर्व नेत्यांना व रस्त्याला श्रद्धांजली वाहिल्याचा बोर्ड झळकल्याने सांगली सह जिल्ह्यामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यावेळी महेश दासानी ,रावसाहेब पाटील, महेश दरुरमठ, सतीश डांगे ,किरण चव्हाण, प्रदीप मोर्चे, बोरवणकर निलेश स्वामी ,आकांक्षा चौकीमठ , सुशांत पाटील, सुनील चौकीमठ प्रकाश स्वामी ,सुनील चौधरी, निखिल दामानी, भानुशाली, सह शाळेची मुलांनी बोंबलून  वाँर्ड सतरा व रस्त्याला श्रद्धांजली वाहिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.