Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

17 बेगम आणि 84 मुलं, 77व्या वर्षी आणखी एका लग्न करण्यासाठी आजोब तयार

17 बेगम आणि 84 मुलं, 77व्या वर्षी आणखी एका लग्न करण्यासाठी आजोबा तयार


मुंबई  : हल्लीच्या काळात लोक छोटं कुटुंब असण्यावर भर देतात. ज्यामध्ये दोन किंवा एका मुलावर लोक समाधानी असतात. ज्यामुळे मुलांची योग्य काळजी घेता येते. त्यांना वेळ देता येतो आणि लागणाऱ्या सर्व सुविधा देखील देता येतात. पण असं असलं तरी देखील आजच्या काळात एका व्यक्तीबद्दल आम्ही सांगणार आहोत ज्याला 10/15 नाही तर चक्क 84 मुलं आहेत.

या व्यक्तीचं वय 77 आहे आणि तो आता 18 व्या लग्नासाठी देखील तयार असल्याचे सांगत आहे. या व्यक्तीचे नाव दाद मोहम्मद मुराद अब्दुल रहमान आहे. ही व्यक्ती दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे राहते. आता दाद मोहम्मद यांना 18 व्यांदा लग्न करून 100 मुलांचे पिता बनायचे आहे जेणेकरून ते आपल्या नावावर विश्वविक्रम करू शकतील. मोहम्मद दादच्या कुटुंबात एकूण 170 लोक आहेत. हे दुबईचे सर्वात मोठे कुटुंब असल्याचे सांगितले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, 77 वर्षीय दाद मोहम्मद यांचा मोठा मुलगा 56 वर्षांचा आहे आणि सर्वात लहान मुलगी आठ वर्षांची आहे. दाद यांना एकूण 84 मुले आहेत आणि आता त्यांना ही संख्य 100 पर्यंत पोहोचवायची आहे. दुबईत एका व्यक्तीला चार बायका ठेवण्याची परवानगी आहे. मग अशा परिस्थितीत दाद आपल्या चार बायकांपैकी एकीला घटस्फोट देतात आणि मग दुसरं लग्न करतात. आता देखील त्यांनी आपल्या नवीन लग्नाची तयारी सुरु केली आहे.


दादच्या बायका त्यांच्या मुलांसह वेगळ्या घरात राहतात आणि ते सर्व आठवड्यातून एकदा दादच्या जुन्या घरात जात. त्याच्या बहुतेक बायका मोरोक्को किंवा फिलिपिन्सच्या आहेत. दाद मुहम्मद यांना विश्वास आहे की शंभर मुलं होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होईल कारण त्यांचे वडिल दाद मुराद अब्दुल रहमान 110 वर्षे जगले त्यांना चार बायका आणि 27 मुले होती.

1995 मध्ये एका अपघातात दाद मुहम्मदला आपला एक पाय गमवावा लागला होता, परंतु त्यानंतरही त्यांनी लग्न आणि मुले होण्यास मागे हटले नाही. त्यांना 100 मुले हवी आहेत, हे त्याचे स्वप्न आहे. दादा यांनी सांगितले की त्यांच्या दोन मुलांचा आकस्मिक मृत्यू झाला नसता, तर ते आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या अधिक जवळ पोहोचले असते. एका मुलाचा 2002 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी अपघातात मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलाचा 2016 मध्ये घरात पडून मृत्यू झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.